मुख्यपृष्ठ / पाककृती / उकडीची तांदळाची भाकरी

Photo of Rice roti by kanchan date at BetterButter
1752
4
0.0(0)
0

उकडीची तांदळाची भाकरी

Mar-03-2018
kanchan date
3 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उकडीची तांदळाची भाकरी कृती बद्दल

जास्त करून कोकणात हि भाकर खाली जाते. पचायला हलकी आणि पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 2 वाटी तांदळाचं पीठ
  2. 2 वाटी पाणी
  3. चवीनुसार मीठ

सूचना

  1. एका भांड्यात 2 वाट्या पाणी उकळत ठेवा
  2. त्यात मीठ घाला
  3. पाण्याला उकळी अली कि त्यात तांदळाचं पीठ घालून नीट घोटून घ्या
  4. गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या
  5. आता गॅस बंद करून भांड्यावर झाकण ठेवा
  6. 2 मिनिटाने पीठ परातीत घेऊन आधी चमच्याने नीट मिक्स करा ( गरम असल्यामुळे)
  7. मग थोडं थंड झालं कि थोडं थोडं थंड पाणी घेऊन पीठ चांगलं मऊ होईपर्यंत मळा
  8. आता जर तुम्हाला थापून हव्या असतील तशा नाहीतर चपाती सारख्या लाटून भाकरी करा
  9. गरम तव्यावर दोन्ही बाजूने नीट भाजून घ्या
  10. आणि गरम गरम भाजी सोबत सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर