मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल भोपळ्याचे भरीत

Photo of Red Pumpkin Raita by Anuradha Kuvalekar at BetterButter
783
5
0.0(0)
0

लाल भोपळ्याचे भरीत

Apr-11-2018
Anuradha Kuvalekar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल भोपळ्याचे भरीत कृती बद्दल

लाल भोपळा शिजवून तयार होणारे चविष्ठ लाल भोपळ्याचे भरीत. पटकन होणारे व लहान-मोठ्यांना आवडणारे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. २५० ग्रॅम लाल भोपळा
  2. १ वाटी घट्ट दही
  3. १ चमचा साखर
  4. १ हिरव्या मिरचीचे तुकडे
  5. २ चमचे शेंगदाण्यांचे कुट
  6. १/४ चमचा जिरं
  7. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
  8. मीठ चवीनुसार

सूचना

  1. लाल भोपळ्याची सालं काढून मध्यम आकाराच्या फोडी करून कुकरमध्ये शिजवून घ्या. शिजवतांना बेताने पाणी घाला.
  2. शिजलेल्या भोपळ्यातील पाणी काढून टाकावे. एका भांड्यात भोपळा गार झाल्यावर मॅश करून घ्या.
  3. त्यात दही, साखर, शेंगदाण्याचं कुट, बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीनुसार मीठ घाला. साजूक तूप तापवून त्यात जिरं व हिरव्या मिरचीचे तुकडे घालून फोडणी करा. तयार फोडणी भोपळ्याच्या मिश्रणात घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर