Photo of Bitter gourd Panchamrit by Nayana Palav at BetterButter
2057
15
0.0(9)
0

Bitter gourd Panchamrit

Apr-21-2018
Nayana Palav
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Bitter gourd Panchamrit कृती बद्दल

अक्षय तृतीयेला पंचामृत हमखास केले जाते. या पंचामृतामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो, रक्त शुद्ध होते. मानसिक शांतता देणारे हे पंचामृत एक उपयुक्त पदार्थ आहे. तुम्ही याचा आपल्या आहारात नक्की समावेश करा. चला तर पाहू याची पाककृती.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कारली छोटी २-३
  2. काजू ८-१०
  3. खोबरयाचे पातळ काप आवश्यकतेनुसार
  4. शेंगदाणे आवश्यकतेनुसार
  5. शेंगदाणा कूट १/४ कप
  6. तिळाचे कूट १/४ कप
  7. हिरव्या मिरच्या ३-४
  8. कढीपत्ता ५-६
  9. चिंचेचा कोळ १/४ कप
  10. कोकम रस (आगळ) १/४ कप
  11. गुळाचा खडा १
  12. हिंग १/४ टीस्पून
  13. हळद १/४ टीस्पून
  14. मोहरी १/४ टीस्पून
  15. जिरे १/४ टीस्पून
  16. मीठ स्वादाुसार
  17. तेल किंवा तूप फोडणीसाठी

सूचना

  1. प्रथम कारले स्वच्छ धुवून घ्या.
  2. कारल्याचे पातळ काप करा.
  3. कारल्याच्या बिया काढा.
  4. कढईत तूप तापवून त्यात काप, काजू, शेंगदाणे परतून घ्या.
  5. एका कढईत तूप तापवून हिंग, मोहरी, जिरे, हळद, कढीपत्ता, मिरच्या घालून फोडणी करुन घ्या.
  6. खोबरयाचे काप घाला.
  7. कारल्याचे काप, शेंगदाणे, तिळकूट, दाणेकूट घाला.
  8. चिंचेचा कोळ, कोकम रस घाला.
  9. जरा शिजू दया.
  10. गुळ घाला.
  11. तयार आहे तुमचे चविष्ट कारल्याचे पंचामृत.

रिव्यूज (9)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sujata Hande-Parab
Jun-07-2018
Sujata Hande-Parab   Jun-07-2018

Yummy and healthy...

Ujwala Surwade
Apr-22-2018
Ujwala Surwade   Apr-22-2018

खूप छान

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर