चिंच टमाटर लोणच | Tamarind Tomato Picle Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  10th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Tamarind Tomato Picle recipe in Marathi,चिंच टमाटर लोणच, Vaishali Joshi
चिंच टमाटर लोणचby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

6

0

चिंच टमाटर लोणच recipe

चिंच टमाटर लोणच बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tamarind Tomato Picle Recipe in Marathi )

 • ११/२ किलो टोमाटो
 • १०० ग्राम चिंच
 • १ वाटी तिखट
 • ११/२ वाटी मीठ
 • २ चमचे हळद
 • १ चमचा हिंग
 • १/२चमचा मेथी पावडर (थोड्या तेलात परतून बारीक़ केलेली )
 • करी पत्याची पाने
 • २०० ग्राम तेल
 • १/२ वाटी ठेचलेल्या लसुण पकळ्य़ा

चिंच टमाटर लोणच | How to make Tamarind Tomato Picle Recipe in Marathi

 1. टोमेटो च्या फोड़ी करून त्यावर मीठ आणि तिखट भुर्भून उन्हात ३-४ दिवस वाळवून घ्या
 2. वाळल्यावर त्याला मिक्सर मधे जाडसर बारीक़ करा पाणी न घालता
 3. २ पिकलेले टोमाटो मिक्सर मध्ये बारीक़ करा आणि त्या रसात चिंच २-३ तास भिजत घालून ठेवा
 4. भिजत ठेवलेली चिंच कोळून घ्या . हव तर जाड गाळनीने गाळून घ्या
 5. आता गैस वर जाड बुडाच पातेल ठेवा
 6. तेल टाका
 7. मोहोरी टाका
 8. हिंग आणि करी पत्ता टाका
 9. ठेचलेला लसुण घालून परता
 10. मेथी पावडर घाला
 11. हळद घालून परतून घ्या
 12. चिंचेचा कोळ घालून परता
 13. टोमेटो पावडर बारीक केलेली त्यात घाला आणि मंद गैस वर तेल सुटे परेन्त परतत राहा
 14. तिखट आणि मीठ घालून पुन्हा ५ मिनिट गैस वर रहू द्या
 15. पूर्ण पाणी आटल्याची खात्री करून गैस बंद करा
 16. अगदी गारे गार झाल्यावर भरणीत भरुन ठेवा

Reviews for Tamarind Tomato Picle Recipe in Marathi (0)