पनीर टिक्का मसाला | Paneer Tikka Masala Recipe in Marathi

प्रेषक Ajinkya Shende  |  17th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Paneer Tikka Masala recipe in Marathi,पनीर टिक्का मसाला, Ajinkya Shende
पनीर टिक्का मसालाby Ajinkya Shende
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

9

0

पनीर टिक्का मसाला recipe

पनीर टिक्का मसाला बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Paneer Tikka Masala Recipe in Marathi )

 • टिक्का साठी-
 • २०० ग्रॅम पनीर चे मोठे चौकोनी तुकडे
 • एका लहान कांद्याचे मोठे तुकडे
 • एका लहान टोमॅटोचे मोठे तुकडे
 • एका लहान सिमला मिरचीचे मोठे चौकोनी तुकडे
 • पाणी निथरवून घेतलेलं घट्ट दही
 • १ चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर
 • अर्धा चमचा धणा-जीरा पावडर
 • अर्धा चमचा गरम मसाला
 • अर्धा ते पाऊण चमचा आलं लसूण पेस्ट
 • मीठ चवीप्रमाणे
 • तेल २ चमचे
 • मेल्टेड बटर
 • ग्रेवी साठी-
 • ३ मोठ्या आकाराचे मोठ्या आकारात कापलेले कांदे
 • २ मोठ्या टोमॅटोचे मोठ्या आकारात कापलेले तुकडे
 • ७-८ काजू
 • ५-७ लसूण पाकळ्या
 • छोटा तुकडा आलं
 • तेल
 • बटर
 • २ चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर
 • अर्धा चमचा धणा जीरा पावडर
 • पाव चमचा हळद
 • अर्धा चमचा किचन किंग मसाला
 • पाऊण चमचा गरम मसाला
 • थोडी कसुरी मेथी
 • चवीप्रमाणे मीठ
 • कोथिंबीर

पनीर टिक्का मसाला | How to make Paneer Tikka Masala Recipe in Marathi

 1. प्रथम एका बाऊल मध्ये घट्ट दही घेऊन त्यात लाल मिरची पावडर,धणा जीरा पावडर,गरम मसाला,मीठ,आलं-लसूण पेस्ट व तेल टाकून दही व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
 2. नंतर त्यात पनीर व भाज्यांचे तुकडे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे व झाकून फ्रिज मध्ये १५-२० मिनिट मॅरीनेट करण्यासाठी ठेवावे.
 3. तोपर्यंत एका पॅन मध्ये ४-५ चमचे तेल टाकून तेल तापल्यावर त्यात कांदा टाकून कांदा गुलाबीसर होईपर्यंत भाजून घ्यावा.
 4. नंतर त्यात टोमॅटो टाकून टोमॅटो व्यवस्थित नरम शिजेपर्यंत परतवून घ्यावे व थंड झाल्यावर भिजवलेले काजू,आलं व लसूण टाकून ह्याची मिक्सर मध्ये स्मूथ पेस्ट बनवून घ्यावी.
 5. नंतर पॅन मध्ये २ चमचे तेल आणि २ चमचे बटर टाकून तेल व बटर व्यवस्थित तापल्यावर त्यात तयार मसाला पेस्ट टाकून ३-४ मिनिट परतवून घ्यावी.
 6. नंतर त्यात लाल मिरची पावडर,हळद,धणा जीरा पावडर व किचन किंग मसाला टाकून ग्रेवी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यावी व आवश्यकतेनुसार पाणी आणि चवीप्रमाणे मीठ टाकून ग्रेवी मध्यम आचेवर शिजू द्यावी.
 7. तोपर्यंत दह्यात मॅरीनेट केलेलं पनीर व भाज्या ग्रिल पॅन वर मेल्टेड बटर लावून व्यवस्थित ग्रिल करून घ्यावे(ग्रील पॅन नसल्यास फ्राय पॅन मध्ये पनीर व भाज्या टॉस करून घेऊ शकता).
 8. ग्रेवी मध्ये ग्रील केलेलं पनीर,भाज्या,गरम मसाला,कसुरी मेथी,थोडी कोथिंबीर व मॅरीनेशन करून उरलेलं दही टाकून भाजी २-३ मिनिट शिजवून घ्यावी.
 9. तयार भाजी सर्विंग प्लेट मध्ये काढून वरून कोथिंबीर टाकून गार्निश करून घ्यावी व बटर पराठ्यासोबत सर्व करावी.

My Tip:

ग्रील केलेल्या पनीर व भाज्यांना कोळश्याचा स्मोक दिला तर चव अजून चांगली लागते.

Reviews for Paneer Tikka Masala Recipe in Marathi (0)