व्हरमीसीली क्रीम चिझ केक | Vermicelli Cream cheese cake Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Vermicelli Cream cheese cake by sharwari vyavhare at BetterButter
व्हरमीसीली क्रीम चिझ केकby sharwari vyavhare
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

व्हरमीसीली क्रीम चिझ केक recipe

व्हरमीसीली क्रीम चिझ केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vermicelli Cream cheese cake Recipe in Marathi )

 • शेवया २०० ग्राम
 • दुध आर्धा लिटर
 • दुध १ कप
 • साखर १ कप
 • बटर 4 चमचे
 • साखर २ चमचे
 • कॉनफ्लावर २ चमचे
 • पाणी २ चमचे

व्हरमीसीली क्रीम चिझ केक | How to make Vermicelli Cream cheese cake Recipe in Marathi

 1. दुध गॅस वर ठेवा व गरम करा
 2. अर्धा कप पाण्यात १ लिंबू पिळा
 3. व दुध उकळायले की त्यात टाकून दुध फाडून घ्या
 4. दुध एका चाळणीत ओला कपडा ठेवा
 5. व पनीर टाका
 6. थंड होऊ दया
 7. थंड झाले की मिक्सर मधून काढा
 8. आपले क्रीम चिझ तयार होईल
 9. एका भांड्यात १ कप दुध घ्या गॅस वर ठेवा
 10. पाणी २ चमचे व कॉनफलावर २ चमचे घेऊन मिक्स करा
 11. व दुध उकळायलेकी ही पेस्ट टाका
 12. व हलवून घ्या
 13. २ चमचे साखर घाला
 14. व मिकस करून घ्या
 15. आता मिक्सर मधून काढलेले क्रीम चिझ टाका
 16. क्रीम चिझ टाकले की मिक्स केले की गॅस बंद करा
 17. मिश्रण जास्त घट्ट करू नये
 18. एका भांड्यात शेवया घ्या व बटर टाकून मिक्स करा
 19. एका ताटा ला किंवा केकच्या भांड्याला तुप लावा
 20. शेवया टाका व पसरून घ्या व दाबून घ्या
 21. आता आपण बनवलेल मिश्रण शेवया वर टाका
 22. दुसरा लेयर शेवयाचा घाला व हालक्या हाताने प्रेस करा
 23. एका कढईत स्टॉड ठेवा त्यावर ताट ठेवा
 24. वरून झाकण ठेवा व मध्यम गॅस वर 35 मि केक बेक करा
 25. एका भांडयात १ कप पाणी व १ कप साखर घ्या
 26. गुलाबजामुन सारखा पाक करा
 27. हा पाक केक वर टाका
 28. १ तास फ्रीज मध्ये सेट करायला ठेवा

My Tip:

पाकात तुम्ही इसेन्स चा वापर करू शकता

Reviews for Vermicelli Cream cheese cake Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo