खांदेशी डाळ-शेंगदाण्याचं बट्ट(आमटी) | Khandeshi dal-shengdanyach batt(aamti) Recipe in Marathi

प्रेषक Ajinkya Shende  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Khandeshi dal-shengdanyach batt(aamti) recipe in Marathi,खांदेशी डाळ-शेंगदाण्याचं बट्ट(आमटी), Ajinkya Shende
खांदेशी डाळ-शेंगदाण्याचं बट्ट(आमटी)by Ajinkya Shende
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

खांदेशी डाळ-शेंगदाण्याचं बट्ट(आमटी) recipe

खांदेशी डाळ-शेंगदाण्याचं बट्ट(आमटी) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khandeshi dal-shengdanyach batt(aamti) Recipe in Marathi )

 • पाव वाटी शेंगदाणे
 • पाव वाटी चण्याची डाळ
 • ३-४ हिरव्या मिरच्या
 • एक इंच आल्याचा तुकडा
 • जीरं
 • बारीक कापलेला कढीपत्ता
 • तेल
 • पाव चमचा हळद
 • अर्धा चमचा धणा-जीरा पावडर
 • चवीप्रमाणे मीठ
 • कोथिंबीर

खांदेशी डाळ-शेंगदाण्याचं बट्ट(आमटी) | How to make Khandeshi dal-shengdanyach batt(aamti) Recipe in Marathi

 1. प्रथम एका कढईत शेंगदाणे भाजून घेणे.
 2. नंतर त्याचं कढईत १ चमचा तेल टाकून चणा डाळ लालसर होईपर्यंत भाजून घेणे.
 3. नंतर मिक्सर मध्ये शेंगदाणे, चणाडाळ,जीरं,मिरची आणि आलं व थोडं पाणी टाकून ह्याची स्मूथ पेस्ट बनवून घेणे.
 4. नंतर एका कढईत ३-४ चमचे तेल टाकून तेल तापल्यावर त्यात बारीक कापलेला कढीपत्ता,जीरं व शेंगदाणा-चणाडाळीची पेस्ट टाकून २-३ मिनिट परतवून घ्यावं.
 5. नंतर त्यात धणा-जीरा पावडर व हळद टाकून पुन्हा २-३ मिनिट परतवून त्यात आवश्यकतेनुसार पाणी(साधारण दीड ते दोन ग्लास),चवीप्रमाणे मीठ व कोथिंबीर टाकून आमटी मध्यम आचेवर १०-१२ मिनिट उकळवून घ्यावी.
 6. तयार आमटी कुठलीही भाकरी व भातासोबत सर्व करावी.

Reviews for Khandeshi dal-shengdanyach batt(aamti) Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo