Home / Recipes / Vangyacha bharit

Photo of Vangyacha bharit by Ajinkya Shende at BetterButter
953
10
0.0(0)
0

Vangyacha bharit

Feb-15-2018
Ajinkya Shende
10 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Vangyacha bharit RECIPE

वांग्याचं भरीत हा महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील सुप्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे.खास जळगाव ची सफेद भारताची वांगी आणि कांद्याची पात ही ह्याची खासियत.

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Maharashtra
  • Main Dish

Ingredients Serving: 4

  1. २ मोठी सफेद भरताची वांगी
  2. १ छोटी जुडी बारीक कापलेली कांद्याची पात
  3. ३ मध्यम आकाराचे पातळ उभे काप(भजी ला कापतो त्याप्रमाणे) करुन घेतलेले कांदे
  4. १ बारीक कापलेला छोटा टोमॅटो
  5. तेल पाव वाटी
  6. जीरं अर्धा चमचा
  7. १०-१२ पाकळ्या ठेचलेला लसुण
  8. ३ बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या
  9. शेंगदाणे(आवडीप्रमाणे)
  10. अर्धा चमचा लाल मिर्ची पावडर
  11. अर्धा चमचा काळा/गोडा मसाला
  12. अर्धा चमचा धणा जीरा पावडर
  13. कोथिम्बीर
  14. मीठ

Instructions

  1. प्रथम वांग्याला थोडं तेल लावून वांगी गॅस च्या फ्लेम वर व्यवस्थित शिजेपर्यंत भाजून घ्यावी.
  2. वांगी थोडी थंड झाल्यावर त्यांची साल काढून खलबत्त्यात व्यवस्थित कुटून घ्यावे किंवा मॅशर ने मॅश करुन घ्यावे.
  3. नंतर एका कढई मधे तेल घेवून तेल तापल्यावर त्यात जीरं,शेंगदाणे,ठेचलेला लसुण व बारीक कापलेली मिर्ची टाकून थोडं परतवुन घ्यावे.
  4. हयानंतर हयात कांदा टाकून कांदा थोडा शिजल्यानंतर त्यात लाल मिर्ची पावडर,काळा/गोडा मसाला व धणा जीरा पावडर टाकून मसाले सुद्धा थोडे परतवुन घ्यावे.
  5. हयानंतर हयात टोमॅटो व अर्ध्यापेक्षा जास्त कांदा पात टाकून ४-५ मिनट मध्यम आचेवर कांदा पात थोडी परतवुन शिजवुन घ्यावी.
  6. नंतर हयात कुटलेली वांगी व चवीनुसार मीठ टाकून ३-४ मिनिट परतवुन घ्यावे.
  7. हयानंतर हयात उरलेली कांदा पात व कोथिम्बीर टाकून पुन्हा २-३ मिनिट भारित शिजू द्यावे.
  8. सर्विंग बाऊल मधे तयार भारित काढून गार्निश करुन घ्यावे.
  9. गरम बाजरीच्या भाकरी सोबर भरीत सर्व करावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE