Home / Recipes / coconut karanji

Photo of coconut karanji by साची सचिन at BetterButter
1003
5
0.0(0)
0

coconut karanji

Feb-18-2018
साची सचिन
30 minutes
Prep Time
40 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Festive
  • Maharashtra
  • Dessert

Ingredients Serving: 5

  1. १ वाटी ओल खोबर
  2. पाउण वाटी गुळ
  3. साजुक तूप
  4. वेलची पावडर
  5. काजू बदाम किशमिश बारीक़ केलेले
  6. १ १/२ वाटी तांदूळ पीठ
  7. मिठ
  8. १ १/२ वाटी पाणी
  9. १ छोटी वाटी दूध
  10. हळद किंवा केळीचे पान

Instructions

  1. एका कढईत २ चमचे तूप घेऊन त्यात खोबर किसलेला गुळ घालुन परतून घ्या.
  2. गुळ पूर्ण वितळला की त्यात वेलची पाउडर काजू बदाम किसमिस घालुन ५ मिनिटे चांगले परतून घ्या
  3. सारण थंड होण्यासाठी ठेवा
  4. आता एक पॅन मधे १ १/२ वाटी पाणी घेऊन त्यात १ चमचा तूप १ छोटी वाटी दूध आणि चविंनुसार मिठ घालुन चांगली उकळी आणा
  5. गॅस मंद करून त्यात २ वाटी तांदूळ पीठ घालुन चांगले मिक्स करा
  6. गॅस बंद करून भांडे १० मिनिटे झाकून ठेवा
  7. मग सर्व उकड परातीत उपसुन घ्यावी आणि कोमट पाण्याचा हात घेऊन मळुन घ्यावी
  8. आता तुपाचा हात घेऊन पारी बनवून घ्या किंवा पोलपाटावर पूरी एवढी पोळी लाटून घ्या
  9. मग त्यात १ चमचा सारण भरून पुरीच्या कडेला दुधाचे बोट फिरवुन करंजी बंद करुन घ्या
  10. मग त्याला हाताने मुरड घालुन घ्या किंवा चिरण्याने कडा कापून घ्या
  11. हळद किंवा केळीचे पान कापून त्याला तेल लावून चालणीत सेट करावे
  12. आता मोदक पात्रात पाणी घेऊन उकळी आली की वरच्या चालणीत हळद किंवा केळीचे पान ठेवावे मग त्यावर करंज्या ठेवून १५ मिनिटे वफवुन घ्यावे.
  13. मोदक पात्र नसेल तर एका पतेलित २ ते ३ ग्लास पाणी घ्यावे उकळले की त्यावर एक चालण ठेवावी त्यावर वरील प्रमाणेच पान ठेवून त्यावर करंजी ठेवून वरुन झाकन ठेवून १५ मिनिटे वफवावे...

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE