Home / Recipes / Green Raddish whole wheat Paratha

Photo of Green Raddish whole wheat Paratha by Nayana Palav at BetterButter
935
11
0.0(0)
0

Green Raddish whole wheat Paratha

Feb-28-2018
Nayana Palav
15 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Green Raddish whole wheat Paratha RECIPE

मुळा ही भाजी खूप औषधी आहे. लहान मुले, आपण मोठी माणसे ही भाजी तिच्या उग्र वासामुळे खायला बघत नाही. मुतखडा झाला असता, मुळा खावा. तर असा हा मुळा पोटात जावा, म्हणून मी त्याचे पराठे बनवले. अतिशय चविष्ट होतात हे पराठे. चला तर पाहू याची पाककृती.

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Punjabi
  • Pan fry
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. गव्हाचे पीठ २ कप
  2. मुळा १
  3. पाणी पीठ मळण्यासाठी
  4. मीठ
  5. तेल २ टीस्पून (पीठ मळण्यासाठी)
  6. तेल १ टीस्पून
  7. साजूक गायीचे तूप २ टीस्पून पराठयांना लावण्यासाठी
  8. हिंग १/४ टीस्पून
  9. हळद १/४ टीस्पून
  10. मोहरी १/४ टीस्पून
  11. लाल तिखट १ टीस्पून
  12. चाट मसाला १/२ टीस्पून

Instructions

  1. गव्हाचे पीठ मळून घ्या.
  2. मुळा स्वच्छ धुवून घ्या. .
  3. पांढरा मुळा किसून घ्या.
  4. पाने कापून घ्या.
  5. एका भांडयात तेल गरम करा.
  6. त्यात हिंग, हळद, मोहरी, घाला.
  7. मुळयाची भाजी, लाल तिखट, चाट मसाला, मीठ घालून परता.
  8. पीठाचे गोळे करा.
  9. एका गोळयात पुरण पोळीत भरतो तसे मुळयाचे सारण भरा.
  10. हलक्या हाताने पराठे लाटा.
  11. काटयाच्या मदतीने पराठयाला बाजूने नक्षी करा.
  12. बाजूने तूप सोडून, पराठे नीट भाजून घ्या.
  13. आता दुसरया बाजूने पराठा भाजून घ्या.
  14. तयार आहे तुमचा पौष्टीक मुळयाचा पराठा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE