Home / Recipes / Badam Katali

Photo of Badam Katali by Deepa Gad at BetterButter
718
11
0.0(0)
0

Badam Katali

May-20-2018
Deepa Gad
10 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
10 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Badam Katali RECIPE

१ वाटी बदाम गरम पाण्यात घालून १० मिनिटे झाकून ठेवणे. नंतर थंड पाण्यात घालून त्याची साले काढावीत. सोललेले बदाम मिक्सरमध्ये अर्धी वाटी दुधात केशर घालून ते बदामासहित पेस्ट करून घ्या. नॉनस्टिक पॅनमध्ये २ च तुपात पेस्ट घालून त्यात १ ते सव्वा वाटी पिठीसाखर घालून सतत ढवळत रहा. मिश्रण घट्ट गोळा होत आलं की वेलची पूड घालून ढवळा नंतर ताटात काढून थंड होण्यास ठेवा. थंड झाल्यावर त्याचा गोळा प्लास्टिक पेपरवर तूप लावून त्यावर दुसरा प्लास्टिक ठेवून थोडं जाडसरच लाटा नंतर वड्या पाडा. खूपच छान लागतात चवीला.

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Diwali
  • Indian
  • Sauteeing
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 10

  1. बदाम १ वाटी
  2. पिठीसाखर सव्वा वाटी
  3. तूप २ च
  4. केशरमिश्रित दूध अर्धी वाटी
  5. वेलचीपूड १ च

Instructions

  1. बदाम गरम पाण्यात घालून १० मिनिटे झाकून ठेवा
  2. नंतर थंड पाण्यात घालून बदामाची साले काढून घ्यावीत
  3. सोललेले बदाम मिक्सरमध्ये घाला त्यातच केशरमिश्रित दूध घालून बारीक पेस्ट करून घ्या
  4. नॉनस्टिक पॅनवर २ च तुपात बदामाची वाटलेली पेस्ट घाला
  5. त्यातच सव्वा वाटी पिठीसाखर घाला आणि सतत ढवळत रहा
  6. गोळा घट्ट होत आला की वेलचीपूड घाला आणि गॅस बंद करून थंड करण्यासाठी डिशमध्ये काढून ठेवा
  7. प्लास्टिक पेपरवर तो गोळा घ्या आणि गोळ्यावर दुसरा प्लास्टिक पेपर ठेवून पोळीप्रमाणे लाटून घ्या
  8. वड्या पाडा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE