लेमन राईस | Lemon Rice Recipe in Marathi

प्रेषक Sanika SN  |  26th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Lemon Rice recipe in Marathi,लेमन राईस, Sanika SN
लेमन राईसby Sanika SN
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

लेमन राईस recipe

लेमन राईस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Lemon Rice Recipe in Marathi )

 • २ वाट्या शिजवलेला भात (शिळा भात वापरला तरी चालेल)
 • एका लिंबाचा रस ( आवडीप्रमाणे कमी - जास्त)
 • २ हिरव्या मिरच्या चिरून
 •  १-२ लाल सुक्या मिरच्या तोडून
 • कढिपत्ता
 • १ टेस्पून शेंगदाणे
 • १ टीस्पून मोहरी 
 • १/४ टीस्पून मेथीदाणे
 • १ टीस्पून चणा-डाळ
 • १ टीस्पून उडदाची डाळ
 • १/४ टीस्पून हींग
 • १/२ टीस्पून हळद 
 • मीठ चवीनुसार
 • तेल

लेमन राईस | How to make Lemon Rice Recipe in Marathi

 1. पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी, मेथीदाणे, उडदाची डाळ व चण्याची डाळीची फोडणी करावी. 
 2. डाळी लालसर रंगावर परतल्या गेल्या की त्यात कढीपत्ता, हींग, हिरव्या व लाल सुक्या मिरच्या घालाव्या. 
 3. थोडे परतल्यावर त्यात हळद व शेंगदाणे घालावे. शेंगदाणे खमंग परतून घ्या.
 4. आता त्यात शिजवलेला भात व मीठ घालावे.
 5. मिश्रण हलक्या हाताने एकत्र करावे.
 6. त्यात लिंबाचा रस घालून गॅस बंद करावा. सगळे नीट मिक्स करून घ्यावे. 
 7. लेमन राईस तयार आहे.
 8. हा राईस तुम्ही लोणच्यासोबत किंवा पापडासोबत सर्व्ह करू शकता.
 9. प्रवासालाही बनवून घेऊ जाऊ शकता.

Reviews for Lemon Rice Recipe in Marathi (0)