ओल्या नारळाच्या करंज्या | KARANJI Recipe in Marathi

प्रेषक Samiksha Mahadik  |  21st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • KARANJI recipe in Marathi,ओल्या नारळाच्या करंज्या, Samiksha Mahadik
ओल्या नारळाच्या करंज्याby Samiksha Mahadik
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

5

0

ओल्या नारळाच्या करंज्या recipe

ओल्या नारळाच्या करंज्या बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make KARANJI Recipe in Marathi )

 • सव्वा कप खवलेला ओला नारळ
 • पाऊण कप किसलेला गूळ
 • अर्धा चमचा वेलची पूड
 • पाऊण कप मैदा
 • पाव कप रवा
 • गरम करून थंड केलेले साजुक तूप 1 चमचा
 • पाऊण कप दूध
 • तेल

ओल्या नारळाच्या करंज्या | How to make KARANJI Recipe in Marathi

 1. गुळ व नारळ एकत्र करून पातेल्यात मंद आचेवर शिजवावे
 2. वेलची पूड घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे
 3. करंजीच्या आवरणासाठी एका बाऊलमध्ये रवा आणी मैदा एकत्र करून त्यात तुपाचे मोहन घालावे व मिक्स करावे
 4. अंदाज घेत घेत गार दूध घालून पीठ घट्ट मळुन घ्यावे व झाकून ठेवावे
 5. 15 ते 20 मिनिटांनी दुधाचा हबका मारून पीठ कुटून घ्यावे
 6. पीठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे
 7. करंज्या वाळू नयेत म्हणून एक ताटली आणि ओला कपडा पिळून घेतलेला तयार ठेवावा
 8. मग पिठाची पारी लाटून त्यात मधोमध नारळाचे सारण भरावे कडेला किंचित दूध लावून पारी बंद करावी असे केल्याने करंजी तळताना फुटणार नाही
 9. पारी बंद करून करंजी डिझाईन मध्ये कापून घ्यावी
 10. सर्वं करंज्या तयार झाल्यावर मध्यम आचेवर गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्यावा

My Tip:

सारण बनवताना ते ओलसर ठेऊ नये नाहीतर करंज्या नरम पडतात

Reviews for KARANJI Recipe in Marathi (0)