मुख्यपृष्ठ / पाककृती / पालकाची पातळ भाजी

Photo of Palakachi Patal bhaji by Arachana Khandelwal at BetterButter
1221
1
0.0(0)
0

पालकाची पातळ भाजी

Sep-04-2018
Arachana Khandelwal
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालकाची पातळ भाजी कृती बद्दल

Healthy

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. १ जुडी पालक
  2. १ मूठ शेंगदाणे
  3. १ मूठ चणाडाळ
  4. १ मूठ अरहर डाळ
  5. २-३ चमचे तुकडा काजू (ऑप्शनल)
  6. 6-8चमचे तुकडा लसूण (ऑप्शनल)
  7. फोडणीसाठी : ४ चमचे तेल,
  8. मोहोरी, हिंग, हळद,
  9. २-३ हिरव्या मिरच्या
  10. १/२ लहान चमचा मेथी दाणे (ऑप्शनल)
  11. १ चमचा भरून चणापिठ
  12. 2चमचा काळा मसाला
  13. ३-४ चमचे चिंचेचा कोळ
  14. १ ते दिड चमचा किसलेला गूळ मिठ

सूचना

  1. शेंगदाणे अरहर आणि चणाडाळ 20 min पाण्यात भिजत ठेवावेत. चणाडाळ, अरहर आणि शेंगदाणे भिजले कि कूकरमध्ये २-३ शिट्ट्या करून शिजवून घ्यावे. शिजवताना किंचीत मिठ घालावे.
  2. पालकाची पानं खुडून ती पाण्यात स्वच्छ करून घ्यावीत. थोडावेळ मोठ्या भोकाच्या चाळणीत पाघळत ठेवावी. नंतर पाने बारीक चिरून घ्यावीत.
  3. पातेल्यात तेल गरम करावे. मोहोरी, हिंग, हळद, मिरच्यांचे बारीक तुकडे, लसूण, मेथीदाणे घालून फोडणी करावी. मध्यम आचेवर त्यात चिरलेला पालक घालावा. पालकाला पाणी सुटले कि त्यात चणापिठ घालावे. आणि चणापिठाबरोबर पालक चांगला घोटावा. चणापिठाच्या गुठळ्या होवू देवू नयेत. २-३ मिनीटे परतावे. चणापिठ घातल्याने पालक चांगल्याप्रकारे घोटला जातो.
  4. पालक चांगला घोटला गेला कि त्यात शिजवलेले शेंगदाणे आणि चणाडाळ घालावी, आवडत असल्यास काजूचे तुकडे घालावे. काळामसाला घालावा. थोडे पाणी, चिंचेचा कोळ, मिठ, आणि गूळ घालावा. १ -२ वेळा उकळी काढावी.
  5. हि भाजी जरा घट्टसरच असते अळूच्या भाजीसारखी त्यामुळे आवश्यक तेवढेच पाणी घालावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर