मुख्यपृष्ठ / पाककृती / हुलग्याची शेंगोळी

Photo of Hulga shengoli by Teju Auti at BetterButter
1894
3
0.0(0)
0

हुलग्याची शेंगोळी

Sep-14-2018
Teju Auti
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हुलग्याची शेंगोळी कृती बद्दल

मराठी पारपांरिक शेंगोळी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्लेंडींग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. हुलग्याचे पीठ ३ वाट्या
  2. ६ लाल सुक्या मिरच्या तिखट
  3. १ चमचा जिरे पावडर
  4. दहा लसूण पाकळ्या
  5. अर्धी वाटी तेल, मीठ

सूचना

  1. सुक्या मिरच्या, लसूण, जिरेपुड असे एकत्र बारीक वाटून घ्या.
  2. हा वाटलेला मसाला कुळथाच्या पिठात घाला चवीप्रमाणे मीठ घाला. पाणी घालून पीठ भाकरीच्या पिठापेक्षा जरा घट्ट मळून घ्या, त्याला तेलाचा हात लावून गोळा करून घ्या.
  3. आता पोळपाटाला जरा तेलाचा हात लाउन लांब शेवयांप्रमाणे पण जाड अशा शेंगा करायच्या व चकली प्रमाणे गोल कराव्यात.त्या वळताना जरूर पडल्यास तेलाचा हात लावत रहा.
  4. गॅसवर एका पातेल्यात अंदाजे शेंगोळी बुडून दोन बोटे उरेल एवढे पाणी घेऊन आधण ठेवा. पाण्याला उकळी आली की त्यात तीन चमचे तेल घाला.उकळी येउद्या.
  5. ता वळलेल्या शेंगोळी त्यात हळू हळू सोडायच्या आहेत. सगळ्या शेंगोळी सोडल्यावर पाच ते वीस मिनिटे त्या शिजूद्या.
  6. गरमा गरम सव्हॆ करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर