चुडा घासा - दालमा (डाळ करीबरोबर पोह्यांची पावडर) | Chuda Ghasa - Dalma ( Powdered beaten rice with Dal curry ) Recipe in Marathi

प्रेषक sweta biswal  |  25th Aug 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Chuda Ghasa - Dalma ( Powdered beaten rice with Dal curry ) by sweta biswal at BetterButter
चुडा घासा - दालमा (डाळ करीबरोबर पोह्यांची पावडर)by sweta biswal
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

234

0

चुडा घासा - दालमा (डाळ करीबरोबर पोह्यांची पावडर) recipe

चुडा घासा - दालमा (डाळ करीबरोबर पोह्यांची पावडर) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chuda Ghasa - Dalma ( Powdered beaten rice with Dal curry ) Recipe in Marathi )

 • 1 वाटी पोहे
 • 1 वाटी खवलेले नारळ
 • 3-4 लहान चमचे तूप
 • 4-5 लहान चमचे साखर
 • एक चिमूटभर फूड ग्रेड कापूर
 • दीड वाटी तूर/चणाडाळ
 • अर्धी वाटी भोपळ्याचे तुकडे
 • अर्धी वाटी बटाटे
 • 1 शेवग्याची शेंग (2 इंचाचे तुकडे कलेली)
 • अर्धी वाटी खवलेले नारळ
 • 3-4 सुक्या लाल मिरच्या
 • अर्धा लहान चमचा जिरे
 • 1 तमालपत्र
 • चिमूटभर हिंग
 • 2 लहान चमचे तूप
 • अर्धा लहान चमचा हळद
 • मीठ चवीनुसार
 • 1/3 लहान चमचा जीर मिरची पूड

चुडा घासा - दालमा (डाळ करीबरोबर पोह्यांची पावडर) | How to make Chuda Ghasa - Dalma ( Powdered beaten rice with Dal curry ) Recipe in Marathi

 1. एका ताटात वाटलेले जाड पोहे घ्या. पोहे साखर आणि तुपात चांगले मिसळा (हे जरा अवघड आणि वेळ घेणारे काम आहे). तूप आणि साखरेच्या मिश्रणात एकजीव होईपर्यंत मिसळा.
 2. आता त्यात खवलेले नारळ आणि कापूर घाला. तुम्हाला मिश्रण कोरडे वाटले, तर त्यात थोडे पाणी घाला. आमचे चुडा घासा तयार आहे.
 3. चण्याची डाळ धुऊन 5-6 तसा भिजवा. प्रेशर कूकरमध्ये चण्याच्या डाळीत भोपळा आणि बटाटे घालून 2 कप पाणी घाला आणि दोन शिट्या होऊ द्या.
 4. गॅस बंद करा आणि कुकर थंड होऊ द्या. आता त्यात शेवग्याच्या शेंगा घालून पुन्हा 1 शिटी होऊ द्या.
 5. फोडणीसाठी - एका कढईत तूप गरम करा. यात लाल मिरची, जिरे, तमालपत्र आणि हिंग घाला.
 6. या फोडणीला डाळीवर घाला आणि भाजलेल्या जिरे मिरची पूड,खवलेल्या नारळाने सजवा. आता आमचा दालमा तयार आहे.
 7. एका ताटात एक चमचाभर चुडा घासा घ्या आणि त्यावर पळी भरून दालमा घाला. एकत्र करा आणि आस्वाद घ्या.

Reviews for Chuda Ghasa - Dalma ( Powdered beaten rice with Dal curry ) Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo