मुख्यपृष्ठ / पाककृती / भाकरीचा चिवडा
भाकरीचा चिवडा' माझी आजी नेहमी बनवायची. माझ्या लहानपणी आमच्याकडे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा भाकरी केली जायची. कधीतरी या भाकरी उरत असत तेव्हा दुसऱ्या दिवशी नाष्ट्याला माझी आजी या शिळ्या भाकरींचा चिवडा बनवायची, याला आम्ही भाकरीचे तुकडे बोलायचो. पुणेरी भाषेत याला भाकरीचा चिवडा म्हणतात. खूप सुंदर लागतो बरं हा चिवडा. तुम्ही खाल्ला नसेल तर जरुर try करा, अगदी अप्रतिम लागतो. परवा पोळ्या करत असताना दोन तीन पोळ्यांची कणिक कमी पडत होती, आता तेवढ्यासाठी कुठे कणिक मळू म्हणून कणिक मळण्याचा कंटाळा केला, म्हटले चला एखादी भाकरी टाकुयात. भाकरी करताना विचार आला की बरेच दिवस झाले भाकरीचे तुकडे (पुणेरी भाषेत भाकरीचा चिवडा) केले नाहीत म्हणून मग दोन भाकरी जास्त केल्या. शिळ्या भाकरीचा हा चिवडा खूप छान लागतो.
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा