मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल भोपळ्याची भाजी

Photo of Lal bhoplyachi Bhaji by Chayya Bari at BetterButter
384
3
0.0(0)
0

लाल भोपळ्याची भाजी

Mar-12-2019
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल भोपळ्याची भाजी कृती बद्दल

लाल भोपळ्याची भाजी खायला मुले कुरकुर करतात पण अशी भाजी करा नक्की खातील

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. लाल भोपळा पावशेर
  2. गूळ आवडीप्रमाणे चवीला
  3. तिखट 1 चमचा
  4. काळा मसाला 1/2चमचा
  5. हळद 1/2चमचा
  6. शेंगदाणे कूट 3 चमचे
  7. चिंचेचा कोळ 1. चमचा
  8. तेल 3 चमचे
  9. जिरे,मोहरी,5 मेथीदाणे फोडणीला
  10. कोथिंबीर 4 चमचे
  11. लसूण पाकळ्या 5
  12. मीठ चवीनुसार

सूचना

  1. प्रथम भोपळ्याची साल काढून कापून मध्यम आकाराच्या फोडी करून धुवून घ्या
  2. शेंगदाण्याचा कूट,लसूण,कोथिंबीर मिक्सरवर फिरवून पेस्ट करा
  3. तेल तापवून जिरे,मोहरी,मेथीदाणे फोडणी करा गॅस बारीक करा
  4. लगेच तिखट,काळा मसाला,हळद,मीठ घाला व 1 चमचा पानी घाला म्हणजे मसाले जळणार नाही
  5. आता वाटण घाला ,चिंचेचा कोळ घाला तेल सुटेपर्यंत परतून घ्या
  6. आता भोपळ्याच्या फोडी व गूळ घालून मिक्स करा
  7. वाटीभर गरम पाणी घालून मंद गॅसवर झाकण घालून शिजवा
  8. 7,8 मिनिटात भोपळा शिजतो मग हलवून गरजेप्रमाणे पाणी घालून प्रमाण समायोजित करावे
  9. गरमागरम भाकरीबरोबर,पोळीबरोबर छान लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर