इंदौरी पोहे | Indori Poha Recipe in Marathi

प्रेषक Padma Rekha  |  6th Nov 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of Indori Poha by Padma Rekha at BetterButter
इंदौरी पोहे by Padma Rekha
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    8

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2476

0

इंदौरी पोहे recipe

इंदौरी पोहे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Indori Poha Recipe in Marathi )

  • पोहे - 1 वाटी
  • कडीपत्त्याची पाने - 10 नग
  • कांदा - 1 लहान (चिरलेला)
  • हिरव्या मिरच्या - 3 (चिरलेल्या)
  • कडीपत्त्याची पाने - 10 नग
  • तेल - 1 मोठा चमचा
  • मोहरी - 1 लहान चमचा
  • जिरे - अर्धा लहान चमचा
  • शेंगदाणे - 1 मोठा चमचा
  • लिंबाचा रस - 1 मोठा चमचा
  • मीठ चवीनुसार
  • हळद - 1/4 लहान चमचा
  • हिंग - 1/4 लहान चमचा

इंदौरी पोहे | How to make Indori Poha Recipe in Marathi

  1. पोहे 2-3 वेळा धुवा आणि नंतर पूर्ण पाणी गाळून घ्या आणि बाजूला ठेवा.
  2. एका कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी घाला आणि तडतडू द्या. नंतर जिरे आणि शेंगदाणे घाला. ते बदामी रंगाचे होईपर्यंत तळा.
  3. नंतर चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कडीपत्ता घाला आणि कांदा नरम होईपर्यंत परता. नंतर त्यात हिंग घालून 1 सेकंद परता.
  4. आता हळद, पोहे आणि लिंबाचा रस घाला आणि नीट हलवा. नंतर मीठ घालून मिसळा आणि आचेवरून उतरवा.
  5. यावर शेवचे मिश्रण पसरवा आणि जिलेबी, कटलेट आणि चहासह गरमगरम वाढा.

Reviews for Indori Poha Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo