मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर दो प्याजा

Photo of Paneer do Pyaza by Ritu Sharma at BetterButter
60245
1196
4.5(0)
8

पनीर दो प्याजा

Jul-23-2015
Ritu Sharma
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • पंजाबी
  • सौटेइंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 2

  1. 200 ग्रॅम्स पनीर (कॉटेज चीज)
  2. 2 कांद्याचे काप
  3. 3 टोमॅटो
  4. 1 कांदा चौरस चिरलेला
  5. 1 हिरवी मिरची चिरलेली
  6. 1 हिरवा वेलदोडा
  7. 1 तमालपत्र
  8. 3 मोठे चमचे तेल
  9. 1 मोठा चमचा ताजी साय
  10. 1 मोठा चमचा चिरलेली कोथिंबीर
  11. 1 मोठा चमचा चिरलेला लसूण
  12. 1 मोठा चमचा धणेपूड
  13. 1 लहान चमचा चिरलेले आले
  14. 1 लहान चमचा लाल तिखट
  15. 1 लहान चमचा वाळलेल्या मेथीची पाने
  16. अर्धा लहान चमचा गरम मसाला
  17. अर्धा लहान चमचा जिरे
  18. 1/8 लहान चमचा हळद पावडर

सूचना

  1. पनीरचे लहान तुकडे करा.
  2. 1 मोठा चमचा तेल गरम करा आणि त्यात चिरलेला कांदा घाला. कांदा पारदर्शक होईपर्यंत तळा आणि एका ताटात काढा.
  3. पुन्हा 2 मोठे चमचे तेल गरम करा. त्यात जिरे, वेलदोडा, तमालपत्र आणि कांदा घालून बदामी रंगाचे होईपर्यंत परता.
  4. आता त्यात आले-लसूण आणि टोमॅटो घाला आणि तेल सुटेपर्यंत शिजवा.
  5. आता लाल तिखट, धणेपूड, गरम मसाला, मीठ आणि कसुरी मेथी घालून एक मिनिट शिजवा.
  6. आता यात पनीर, कांद्याचे चौरस तुकडे आणि अर्धा कप पाणी घाला. रस्सा घट्ट होईपर्यंत शिजवा.
  7. आता त्यात ताजी साय घाला आणि आचेवरून उतरवा.
  8. चांगले मिसळा आणि वाळलेल्या मेथीच्या पानांनी सजवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर