भरलेले पाणगे | BHARLELE panage Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  5th Jan 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • BHARLELE panage recipe in Marathi,भरलेले पाणगे, Chayya Bari
भरलेले पाणगेby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

2

4 votes
भरलेले पाणगे recipe

भरलेले पाणगे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make BHARLELE panage Recipe in Marathi )

 • भिजलेली हरबरा डाळ १ वाटी
 • शेपूची भाजी १/२वाटी
 • हिरवी मिरची आले लसूण पेस्ट २चमचे
 • मीठ चवीपुरते
 • हळद किंचित
 • तेल १/४वाटी
 • कणिक १.५वाटी
 • रवा १/४वाटी
 • मीठ
 • तीळ १चमचा

भरलेले पाणगे | How to make BHARLELE panage Recipe in Marathi

 1. तयारीत कणिक रवा एकत्र करून मीठ व तेलाचे मोहन देऊन घट्ट भिजवले
 2. डाळ बारीक केली
 3. शेपूची भाजी धुवून चिरून घेतली
 4. डाळ,भाजी,आले लसूण मिरची पेस्ट,हळद,मीठ मिक्स केले
 5. सारण तयार झाले
 6. सारणाचे गोळे करून चाळणीला तेल लावून त्यावर ठेवले
 7. कढईत पाणी स्टॅन्ड व त्यावर चाळणी ठेवून ह्ये गोळे १०मिनिटे वाफवले
 8. मग पिठाची पुरीपेक्षा थोडी मोठी गोळी घेऊन चारपदरी पोळीप्रमाणे लाटून त्यात वाफवलेले गोळा ठेवून बंद केले
 9. परत भरलेले पाणगे चाळणीवर ठेवले या आधीप्रमाणे १५मिनिटे वाफवले
 10. मग ह्ये पाणगे शॅलो फ्राय केले
 11. हिरव्या लाल चटणीबरोबर स्नॅक्सला गरम गरम द्यावे

My Tip:

थोडं व्हेरिएशन केल्याने चविष्ट लागतात स्टफिंग बदलू शकतो १पाणगे स्नॅक्स ला पुरेसा

Reviews for BHARLELE panage Recipe in Marathi (2)

Mamta Joshia year ago

खुप छान
Reply

Vijay Baria year ago

खुपच छान
Reply