Chana Masala Gravy | Chana Masala Gravy Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  29th Jan 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Photo of Chana Masala Gravy by Aarti Nijapkar at BetterButter
Chana Masala Gravyby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

36

1

1 vote
Chana Masala Gravy recipe

Chana Masala Gravy बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chana Masala Gravy Recipe in Marathi )

 • तेल २ मोठे चमचे
 • कांदा लसूण मसाला १ चमचा
 • लाल तिखट १ मोठा चमचा
 • धने पावडर १ मोठा चमचा
 • हळद १ लहान चमचा
 • मीठ स्वादानुसार
 • स्टार फूल १
 • हिरव्या वेलची २
 • काळिमिरी ४ ते ५
 • लवंग ४ ते ५
 • गरम मसाला
 • बडिशेप १ मोठा चमचा
 • खसखस १ मोठा चमचा
 • जिरे १ मोठा चमचा
 • लसूण पाकळ्या ७ ते ८
 • आल १/२ इंच
 • कडिपत्ते ७ ते ८ पाने
 • पुदिना ५ ते ६ पाने
 • कोथिंबीर २ ते ३ कांड्या किंवा मोठे चमचे
 • सूखे खोबरं १/४ कप
 • टोमॅटो १ मोठा
 • कांदा २ मोठे
 • भिजवलेले चणे १ वाटी

Chana Masala Gravy | How to make Chana Masala Gravy Recipe in Marathi

 1. सर्व प्रथम भिजवलेले चणे घ्या
 2. चण्यात पाणी घालून कूकर मधून ३ ते ४ शिटी करुन घ्या
 3. शिजवलेले चणे ताटात काढून घ्या
 4. आता चिरलेला कांदा , टोमॅटो , कोथिंबीर , पुदिना , सूखे खोबरं , आल व लसूण , बाकी सर्व साहित्य काढून घ्या
 5. आता खडा मसाला, जिरे ,बडिशेप ,खसखस भाजून घ्या व गार करुन घ्या
 6. मग त्याची पावडर करुन घ्या
 7. मग कांदा , टोमॅटो , सूखे खोबरं , आलं लसूण व्यवस्थित तेलात भाजून घ्या
 8. चांगल परतवून झाल की कोथिंबीर व पुदिना घाला
 9. भाजून झाल्यावर एका ताटात काढून गार करुन घ्या
 10. आता गार मिश्रण मिक्सर जार मध्ये घालून पेस्ट करुन घ्या थोडे पाणी घालून वाटा
 11. खोलगट पातेले घ्या त्यात तेल घालून तापवून घ्या
 12. तेलात कडिपत्ते घाला
 13. आता वाटून बारीक केलेला मसाला पावडर व लाल तिखट , हळद, धने पावडर , कांदा लसूण मसाला, मीठ तेलात घालून परतवून घ्या मंद आचेवर
 14. करपवू नये
 15. आता वाटलेले पेस्ट घालावी
 16. मिश्रण एकजीव करुन घ्या
 17. मसाला एकजीव करुन एक छोटीशी उकळी येऊ द्या
 18. मग थोडसं पाणी घाला व मसाला शिजवून घ्या
 19. मसाला चांगल शिजले कि शिजवलेले चणे घाला व मिश्रण एकजीव करुन घ्या
 20. मग उकळी येऊ द्या ७ ते ८ मि.
 21. मग गरमागरम गरम चणा मसाला ग्रेवी तयार
 22. हे आपण चपाती, भाकरी व भाता सोबत खाऊ शकतो
 23. पण मला हे पावासोबत खूप आवडते
 24. वर कोथिंबीर घालून सर्व्ह करा

Reviews for Chana Masala Gravy Recipe in Marathi (1)

Priyanka Pendurkara year ago

khup chan
Reply