Photo of Chana Masala Gravy by Aarti Nijapkar at BetterButter
5242
8
0.0(1)
0

Chana Masala Gravy

Jan-29-2018
Aarti Nijapkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. भिजवलेले चणे १ वाटी
  2. कांदा २ मोठे
  3. टोमॅटो १ मोठा
  4. सूखे खोबरं १/४ कप
  5. कोथिंबीर २ ते ३ कांड्या किंवा मोठे चमचे
  6. पुदिना ५ ते ६ पाने
  7. कडिपत्ते ७ ते ८ पाने
  8. आल १/२ इंच
  9. लसूण पाकळ्या ७ ते ८
  10. जिरे १ मोठा चमचा
  11. खसखस १ मोठा चमचा
  12. बडिशेप १ मोठा चमचा
  13. गरम मसाला
  14. लवंग ४ ते ५
  15. काळिमिरी ४ ते ५
  16. हिरव्या वेलची २
  17. स्टार फूल १
  18. मीठ स्वादानुसार
  19. हळद १ लहान चमचा
  20. धने पावडर १ मोठा चमचा
  21. लाल तिखट १ मोठा चमचा
  22. कांदा लसूण मसाला १ चमचा
  23. तेल २ मोठे चमचे

सूचना

  1. सर्व प्रथम भिजवलेले चणे घ्या
  2. चण्यात पाणी घालून कूकर मधून ३ ते ४ शिटी करुन घ्या
  3. शिजवलेले चणे ताटात काढून घ्या
  4. आता चिरलेला कांदा , टोमॅटो , कोथिंबीर , पुदिना , सूखे खोबरं , आल व लसूण , बाकी सर्व साहित्य काढून घ्या
  5. आता खडा मसाला, जिरे ,बडिशेप ,खसखस भाजून घ्या व गार करुन घ्या
  6. मग त्याची पावडर करुन घ्या
  7. मग कांदा , टोमॅटो , सूखे खोबरं , आलं लसूण व्यवस्थित तेलात भाजून घ्या
  8. चांगल परतवून झाल की कोथिंबीर व पुदिना घाला
  9. भाजून झाल्यावर एका ताटात काढून गार करुन घ्या
  10. आता गार मिश्रण मिक्सर जार मध्ये घालून पेस्ट करुन घ्या थोडे पाणी घालून वाटा
  11. खोलगट पातेले घ्या त्यात तेल घालून तापवून घ्या
  12. तेलात कडिपत्ते घाला
  13. आता वाटून बारीक केलेला मसाला पावडर व लाल तिखट , हळद, धने पावडर , कांदा लसूण मसाला, मीठ तेलात घालून परतवून घ्या मंद आचेवर
  14. करपवू नये
  15. आता वाटलेले पेस्ट घालावी
  16. मिश्रण एकजीव करुन घ्या
  17. मसाला एकजीव करुन एक छोटीशी उकळी येऊ द्या
  18. मग थोडसं पाणी घाला व मसाला शिजवून घ्या
  19. मसाला चांगल शिजले कि शिजवलेले चणे घाला व मिश्रण एकजीव करुन घ्या
  20. मग उकळी येऊ द्या ७ ते ८ मि.
  21. मग गरमागरम गरम चणा मसाला ग्रेवी तयार
  22. हे आपण चपाती, भाकरी व भाता सोबत खाऊ शकतो
  23. पण मला हे पावासोबत खूप आवडते
  24. वर कोथिंबीर घालून सर्व्ह करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Priyanka Hodawadekar
Oct-10-2018
Priyanka Hodawadekar   Oct-10-2018

khup chan

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर