मुख्यपृष्ठ / पाककृती / मटकीची झणझणीत रस्सा भाजी

Photo of Matakichi Rassa Bhaji by Archana Lokhande at BetterButter
2267
6
0.0(0)
0

मटकीची झणझणीत रस्सा भाजी

Feb-07-2018
Archana Lokhande
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटकीची झणझणीत रस्सा भाजी कृती बद्दल

मटकीची झणझणीत रस्सा भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी मोड आलेली मटकी
  2. दोन कांदे
  3. दोन टोमॅटो
  4. १ १/२ चमचे आल-लसूण पेस्ट
  5. मोहरी
  6. हळद
  7. २ चमचे लाल तिखट
  8. मीठ
  9. २-३ चमचे तेल
  10. पाणी
  11. हिंग
  12. कोथिंबिर

सूचना

  1. कांदा आणि टोमॅटो बारीक बारीक चिरून घेतला.
  2. १/२ वाटी मटकी थोडे तेल घालून भाजून मिक्सरवर ओबडधोबड वाटून घेतली.
  3. कढईत तेल गरम करून मोहरी घालून तडतडू दिली.
  4. नंतर हिंग घालून कांदा आणि टोमॅटो घालून छान दोन मिनिटे परतून घेतला.
  5. मटकी घालून मिक्स करून एक ते दोन सेकंद परतून त्यातच वाटलेली मटकी परतली.
  6. नंतर हळद, तिखट आणि मीठ घालून मिक्स करून १ -१ १/२ कप पाणी घालून झाकण ठेवून ५-६ मिनिटे शिजवून घेतले.
  7. भाजी शिजल्यावर वरून कोथिंबीर घालून मिक्स करून गँस बंद केला.
  8. मटकीचा झणझणीत रस्सा भाकरी सोबत अप्रतिम लागतो. त्यात भाजी आणि भाकरी चुलीवरची असेल तर क्या बात......

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर