अंडा करी | Eggs curry Recipe in Marathi

प्रेषक Ujwala Nirmale  |  10th Feb 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Photo of Eggs curry by Ujwala Nirmale at BetterButter
अंडा करीby Ujwala Nirmale
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

17

1

2 votes
अंडा करी recipe

अंडा करी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Eggs curry Recipe in Marathi )

 • 6 अंडी उकडलेली
 • 1 मोठा कांदा बारीक चिरून
 • खडा मसाला --
 • 2लवंग ,4मिरी 1 तुकडा दालचिन
 • 1वाटी खोबऱ्याचा मसाला
 • 1 वाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे
 • 1वाटी कोथंबिर ,1च.जिरे, 1च. तिळ ,
 • 10/12 लसून पाकळ्या ,1इंच आले
 • 2 च. लाल तिखट
 • चवीनुसार मीठ
 • 1 वाटी कोथंबिर बारीक चिरुन
 • तेल आवश्यकते नुसार

अंडा करी | How to make Eggs curry Recipe in Marathi

 1. अंडी उकडून ,कव्हर काढून घ्या
 2. नंतर मिक्सरमध्ये खोबऱ्याचा मसाला करून घ्या
 3. त्यासाठी ओले खोबरे ,आले ,लसून,कोथंबिर
 4. जीरे ,तीळ हे सर्व वाटून घ्यावे
 5. कढई घेऊन त्यात 2 च. तेल घाला
 6. तेल गरम झाल्यावर त्यात कांदा घालून परतावे
 7. खडा मसाला घाला
 8. नंतर त्यात खोबऱ्याचा मसाला घालून परतावे तेल सुटले की त्यात लाल तिखट घाला
 9. छान परता नंतर मीठ चवीनुसार घालून आवश्यक तेवढे पाणी सोडून उकळी येवू द्या
 10. उकळी आल्यावर त्यात अंडी सोडा
 11. 5 मि. अंडा करी मंद गँसवर शिजू द्यावे
 12. त्यानंतर अंडाकरी तयार
 13. कोथंबिरने सजवा
 14. रोटी ,चपाती, भाकरी,किंवा भाता सोबत सर्व्ह करा

My Tip:

अंडी छान सोलण्यासाठी शिजवताना 1 च. मीठ घालावे अंडी ताजी असली तरी छान सोलतात.

Reviews for Eggs curry Recipe in Marathi (1)

Dhanashree Nesarikar2 years ago

ताई एकदम भारी:ok_hand::ok_hand:
Reply
Ujwala Nirmale
2 years ago
Thank you