ढोकळा | Dhokla Recipe in Marathi

प्रेषक Trupti Raut  |  13th Feb 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of Dhokla by Trupti Raut at BetterButter
ढोकळाby Trupti Raut
  • तयारी साठी वेळ

    4

    तास
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

3

0

0 votes
ढोकळा recipe

ढोकळा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dhokla Recipe in Marathi )

  • दही एक वाटी ,पाणी अर्धा ग्लास
  • बेसन पीठ 2वाटी
  • हळद,कढीपत्ता ,मीठ,इनो फ्रुट सॉल्ट एक चमचा
  • मिरची,साखर,जिरे मोहरी,तेल,हिंग ,कोथिंबीर,अर्धी वाटी पाणी

ढोकळा | How to make Dhokla Recipe in Marathi

  1. दही पाणी मिक्स करून त्यात मावेल इतके पीठ मिक्स करायचे ,जेणे करून पीठ भज्यांच्या पिठापेक्षा थोड पातळ असावे
  2. 4/5तास तसेच झाकून उबदार जागी ठेवायचे पीठ .
  3. 4/5तासानंतर त्यात एक चमचा साखर एक चमचा तेल हळद मीठ टाकून एकजीव करायचे एकाच बाजूनी फेटायचे .
  4. स्टीमर मध्ये पाणी गरम करायचे ,,ढोकळा करायच्या भांड्याला तेल लावायचे
  5. नंतर एक चमचा इनो त्या मिश्रणात टाकून तो मिक्स करून लगेच तेल लावलेल्या भांड्यात पीठ घालून ढोकळा स्टीम करायचा .
  6. 15मिनिट लागतात ....तरीनंतर चाकू त्यात मध्ये टाकून शिजला का ढोकळा पाहू शकतो आपण...पीठ नाही चिटकले चाकूला तर ढोकळा redy
  7. फोडणी साठी तेलात जिरे मोहरी हिंग कढीपत्ता मिरची साखर एक चमचा टाकून अर्धी वाटी पाणी टाकायचे उकळी काढून मग हि फोडणी कट केलेल्या ढोकळ्यावर टाकायची ...
  8. कोथिंबीर घालून सर्व करा

My Tip:

फोडणी मध्ये साखर आणि पाणी टाकल्यास ढोकळा कोरडा नाही पडत

Reviews for Dhokla Recipe in Marathi (0)