मुख्यपृष्ठ / पाककृती / BESAN dhokla

Photo of BESAN dhokla by Tejas Tawade at BetterButter
399
12
0.0(1)
0

BESAN dhokla

Feb-15-2018
Tejas Tawade
8 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

BESAN dhokla कृती बद्दल

खमण ढोकळा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • इतर
 • गुजरात
 • बेकिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. बेसन १५० ग्रॅम
 2. रवा एक छोटी वाटी
 3. आला लसूण पेस्ट
 4. मीठ
 5. इनो सॉल्ट ( इनो लेमन)
 6. साखर
 7. हळद
 8. तेल
 9. पाणी
 10. लिंबू पिळून रस
 11. मिरची
 12. कडीपत्ता
 13. मोहरी
 14. हिंग

सूचना

 1. प्रथम एका मोठ्या भांड्यात चाळणी च्या मदतीने बेसन चालून घ्या
 2. त्या मध्ये रवा घाला
 3. साखर घाला
 4. हे चांगले मिक्स करा आणि थोडे थोडे थोडे पाणी घालून मध्यम घट्ट मिश्रण तयार करा
 5. तयार मिश्रणात अर्धा लिंबू पिळून घ्या आणि मिश्रण चांगले एकजीव करा
 6. ५ मिनिटे मिश्रण चांगले झाकून ठेवा
 7. ओव्हन असेल तर आधी ५ मिनिटे गरम करून घ्या
 8. किंवा एका मोठ्या भांड्यात एक कप पाणी घालून त्यात एक इंच ची जाळी ठेवा
 9. आणि हे भांडे झाकून घेऊ व त्या खालील गॅस चालू करा
 10. त्या नंतर एका विशिष्ट प्रकारच्या भांड्यात तेल किंवा तूप लावून पसरवून घ्या जे भांड आपण मोठ्या वाडग्यात ठेवणार आहोत
 11. आता आपण तयार केलेल्या मिश्रणात हळद ,आला लसूण पेस्ट , मीठ एकजीव करून घेऊ
 12. एक छोटा चमचा तेल घालून मिक्स करा
 13. आणि मग हयात इनो सॉल्ट किंवा बेकिंग सोडा घालून लगेचच मिश्रण एकजीव करून घ्या थोडं पाणी घालून मिक्स करावे
 14. आणि तेल किंवा तूप लावलेल्या भांड्यात हे तयार मिश्रण घालून चांगले सेट करून घ्या त्या साठी जरा हलक्या हाताने भांडे सपाट जागे वर अलगत आपटा
 15. आता आधी गरम केलेल्या ओव्हन मध्ये किंवा भांड्यात हे मिश्रणाचे भांडे लगेचच ठेवून घ्या
 16. २० मिनिटे चांगले मध्यम आचेवर गरम करून घ्या
 17. २० मिनिट नंतर एका सूरी च्या साहाय्याने ढोकळा तयार झाला का ते खात्री करून घ्या
 18. तयार झालेल्ल्या ढोकळा ला साध्या तापमान मध्ये थंड होऊद्या
 19. तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊ
 20. एक छोट्या फोडणी च्या भांड्यात थोडासा तेल घालून त्यात मोहरी, मिरची ,कडीपत्ता, हिंग, साखर, मीठ घालुन ह्याची फोडणी करून घ्या
 21. आणि त्यात थोडेसे पाणी मिक्स करा अर्धा कप पाणी
 22. आता तयार ढोकळा एका डिश मध्ये काढून घ्या व त्यावर फोडणी समान अशी पसरावा
 23. ज्यामुळे पूर्ण ढोकळा ला त्याची चव येते
 24. आता तयार ढोकळा आपल्या आवडी नुसार कापून घ्या. पाहिजे त्या आकारात.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sarita Tawade
Feb-15-2018
Sarita Tawade   Feb-15-2018

Looking nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर