234
6
0.0(1)
0

Fusion Dhokla

Mar-09-2018
Swati Kolhe
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. मोड आलेले मूग १ कप
  2. पालक चिरलेला १/२ कप
  3. गाजर चिरलेला १/४ कप
  4. मटार १/८ कप
  5. अद्रक १ tsp
  6. हिरवी मिरची ४
  7. बेसन पीठ ३-४ tbsp
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल १ tsp
  10. हिंग १/४ tsp
  11. फोडणीसाठी:
  12. तेल १ tbsp
  13. उडीद डाळ १/२ tsp
  14. मोहरी १ tsp
  15. कडीपत्ता ८-१०
  16. सजावटीसाठी:
  17. ओले खोबरे १-२ tbsp
  18. कोथिंबीर १-२ tbsp

सूचना

  1. प्रथम मिक्सर जारमध्ये मोड आलेले मूग जाडसर भरड करून काढून घ्या.
  2. मग पालक, गाजर, मटार, अद्रक, मिरच्या व थोडे पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्या.
  3. आता मोठ्या बाउल मध्ये मूग व पालकाची पेस्ट घेऊन छान एकजीव करा.
  4. नंतर बेसन पीठ, तेल, हिंग, हळद, व मीठ घाला.
  5. पाणी कमी असल्यास पाणी घालून ढोकळा बॅटर सरबरीत करून घ्या.
  6. आता कुकर गरम करून त्यात २ ग्लास पाणी घालून १ उकळी येऊ द्या.
  7. शेवटी ढोकळा बॅटरमध्ये फ्रुट सॉल्ट घालून चांगले फेटून घ्या, जेणेकरून बॅटर मध्ये हवा भरली जाईल व ते फुगेल.(अति फेटू नये)
  8. वरील बॅटर झटकन तेल लावलेल्या डब्ब्यात घालून कुकर मध्ये स्टँड ठेवून त्यावर झाकण ठेवून १५-२० मिनिटं वाफ काढून घ्यावी.
  9. फोडणीसाठी तेल गरम करून त्यात उडीद डाळ, मोहरी, कडीपत्ता घालून फोडणी करून घ्यावी.
  10. ढोकळा थोडा कोमट झाल्यावर त्याचे काप पाडून वरून फोडणी दिलेले तेल, कोथिंबीर व ओले खवलेले खोबरे घालून सर्व्ह करावे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Mar-13-2018
BetterButter Editorial   Mar-13-2018

Hi Swati, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at chefs@betterbutter.in so we may display for public viewing.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर