मुख्यपृष्ठ / पाककृती / Nachani Satva Ragi Pudding

Photo of Nachani Satva Ragi Pudding by Sudha Kunkalienkar at BetterButter
0
4
5(1)
0

Nachani Satva Ragi Pudding

Apr-30-2018
Sudha Kunkalienkar
900 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Nachani Satva Ragi Pudding कृती बद्दल

हा गोव्याचा स्पेशल गोड पदार्थ आहे. हा पदार्थ मी माझ्या सासूबाईंकडून शिकले.खूप पौष्टिक आणि स्वादिष्ट असा हा नाचणी चा पदार्थ नक्कीच करून पहा.

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • एव्हरी डे
 • गोवा
 • सिमरिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

 1. नाचणी १ कप
 2. खवलेला ओला नारळ १ का
 3. चिरलेला गूळ अर्धा कप (चवीनुसार कमी- जास्त करा)
 4. वेलची पूड पाव चमचा
 5. काजू चे तुकडे २ मोठे चमचे
 6. तूप १ चमचा
 7. मीठ पाव चमचा

सूचना

 1. नाचणी धुवून ८ तास पाण्यात भिजवून ठेवा
 2. पाणी काढून टाका आणि नाचणी मिक्सर मध्ये अगदी बारीक वाटून घ्या.छान मऊ पेस्ट झाली पाहिजे. हवं असल्यास वाटताना थोडे पाणी घाला
 3. नाचणी ची पेस्ट मलमल च्या कापडाने गाळून घ्या म्हणजे नाचणीची सालं वेगळी होतील. ही सालं टाकून द्या .
 4. नाचणीची पेस्ट एका पातेल्यात घालून त्यात पाणी घाला. पेस्ट च्या वर १ सेमी पाणी येईल एवढं पाणी घाला. पातेल्यावर झाकण ठेवून ६ तास ठेवा
 5. आता पातेल्यातलं पाणी ओतून टाका.खाली जो नाचणीचा थर असेल ते नाचणीचं सत्व आपल्याला शिजवायचं आहे.
 6. नारळाचं दूध काढून घ्या
 7. एका जाड बुडाच्या पातेल्यात हे सत्व घाला. त्यात नारळाचं दूध, मीठ  आणि गूळ घाला. मिक्स करून मंद आचेवर शिजवा.
 8. १५-२० मिनिटांनी मिश्रणाला तकाकी यायला लागेल. याचा अर्थ मिश्रण शिजत आलंय.
 9. मिश्रणात काजूचे तुकडे, वेलची पूड घाला आणि मिक्स करा .
 10. एका सपाट ताटाला तूप लावून घ्या.
 11. उरलेलं तूप मिश्रणात घालून मिक्स करा आणि गॅस बंद करा
 12. मिश्रण तूप लावलेल्या ताटलीत एकसारखं पसरून घ्या.
 13. गार झाल्यावर २ तास फ्रिज मध्ये ठेवा
 14. वड्या कापून नाचणीचं गार गार स्वादिष्ट सत्व डेसर्ट म्हणून सर्व्ह करा.
 15. हे सत्व फ्रीझ मध्ये ३-४ दिवस छान राहते.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
deepali oak
Apr-30-2018
deepali oak   Apr-30-2018

Mast

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर