दही पोहे | Dhahi Poha Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  13th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Dhahi Poha recipe in Marathi,दही पोहे, priya Asawa
दही पोहेby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

दही पोहे recipe

दही पोहे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dhahi Poha Recipe in Marathi )

 • पोहे 1 कप
 • कांदा 1 बारीक चिरलेला
 • हिरवी मिरची 2
 • कढीपत्ता 5-6 पान
 • फेटलेले दही पाव कप
 • हळद 1/2 चमचा
 • तेल 1 चम्मचा
 • मोहरी - जीरा 1 चम्मचा
 • शेंगदाणे 2 चमचे
 • मीठ - साखर चवीनुसार
 • कोथिंबीर वरुन टाकायला
 • बारीक शेव वरुन टाकायला

दही पोहे | How to make Dhahi Poha Recipe in Marathi

 1. एका कडाईत तेल गरम करायला ठेवा
 2. तेल गरम झाल्यावर मोहरी - जीरे टाकून फोडणी द्या
 3. शेंगदाणे तळून काढुन घ्या
 4. कांदे खरपूस भाजून घ्या
 5. कढीपत्ता व हळद, साखर टाकून भाजुन घ्या
 6. पोहे, शेंगदाणे व मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या
 7. 2-3 मिनीट झाक ठेवून वाफवून घ्या
 8. सर्व करताना एका प्लेट मध्ये पोहे त्याच्यावर दही, बारीक शेव, कोथिंबीर टाकून सजवून गरमागरम पोहे सर्व करा

Reviews for Dhahi Poha Recipe in Marathi (0)