Home / Recipes / Couscous Moti Pilaf

Photo of Couscous Moti Pilaf by Nayana Palav at BetterButter
989
16
0.0(0)
0

Couscous Moti Pilaf

Mar-11-2018
Nayana Palav
15 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Couscous Moti Pilaf RECIPE

ही रेसिपी माझे संशोधन आहे. पौष्टिक पण तेच तेच पदार्थ खाउन आपल्याला कंटाळा येतो. म्हणून मी खुसखुस चा पुलाव बनवला. ब्रोकोली, लहान कणीस, रंगीत ढोबळी मिरची, सारख्या पौष्टिक भाज्या त्यात घातल्या. त्यामुळे दिसायला पण आकर्षक झाला. चला तर पाहू याची पाककृती.

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Fusion
  • Boiling
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. खुसखुस २०० ग्राम
  2. ब्रोकोली १०० ग्राम
  3. लाल ढोबळी मिरची १/२
  4. हिरवी सिमला मिरची १/२
  5. पिवळी सिमला मिरची १/२
  6. लहान कणीस २
  7. काळी मीरी ४
  8. लवंग ४
  9. दालचिनी १/२ इंच
  10. तेजपत्ता २
  11. बदियान २
  12. लाल मिरची २
  13. आल लसूण पेस्ट १ टेबलस्पून
  14. पार्सली मुठभर
  15. तूप १ टेबलस्पून
  16. मीठ चवीनुसार
  17. पाणी आवश्यकतेनुसार.

Instructions

  1. प्रथम खुसखुस धुवून भिजत घाला.
  2. भिजल्यावर त्यात पाणी घालून उकळत ठेवा.
  3. थोडे मउ झाले की एका चाळणीत ओतून त्यावर थंड पाणी ओतून निथळत ठेवा.
  4. आता १ भांडे गॅसवर गरम करा.
  5. त्यात तूप घाला.
  6. आता सगळे खडे मसाले घाला.
  7. आता आलं लसूण पेस्ट घाला.
  8. भाज्या घालून परता.
  9. मिरच्या घालून नीट परतावे.
  10. आता खुसखुस घाला, मीठ घाला.
  11. पार्सली कापून घाला.
  12. तयार आहे तुमचा पौष्टिक आणि स्वादिष्ट खुसखुस पिलाफ.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE