Home / Recipes / Aloo matar

Photo of Aloo matar by Ajinkya Shende at BetterButter
1208
5
0.0(0)
0

Aloo matar

Mar-22-2018
Ajinkya Shende
25 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Indian
  • Main Dish

Ingredients Serving: 4

  1. ५ मध्यम अकाराचे उकडलेले बटाटे
  2. २ मोठे बारीक कापलेले कांदे
  3. ३ मध्यम आकाराच्या टोमॅटो ची प्यूरी
  4. १ वाटी ब्लांच केलेले ताजे हीरवे वाटाणे
  5. तेल,हींग,जीरं
  6. १ छोटा चमचा बारीक कापलेलं आलं
  7. १ छोटा चमचा बारीक कापलेली हिरवी मिर्ची
  8. २ चमचे काश्मीरी लाल मिर्ची पावडर
  9. १ चमचा किचन किंग मसाला
  10. अर्धा चमचा हळद
  11. अर्धा चमचा धणा जीरा पावडर
  12. अर्धा चमचा गरम मसाला
  13. अर्धा चमचा आमचूर पावडर
  14. मीठ चवीनुसार
  15. बारीक कापलेली कोथिम्बीर
  16. सजावटीसाठी कोथिम्बीर आणि आल्याचे पातळ उभे काप

Instructions

  1. प्रथम पॅन मधे ४-५ चमचे तेल टाकून तेल तापल्यावर त्यात जीरं,आलं आणि हिरवी मिर्ची टाकून थोडं परतवुन घ्यावं.
  2. नंतर त्यात बारीक कापलेला कांदा टाकून कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतवुन घ्यावा.
  3. कांदा व्यवस्थित परतवुन झाल्यावर त्यात टोमॅटो प्यूरी टाकून तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवुन घ्यावी.
  4. नंतर एका वाटीत पाणी घेवून त्यात गरम मसाला सोडून बाकी सर्व मसाले टाकून त्याची पेस्ट बनवुन घ्यावी व ही पेस्ट टाकून मसाले व्यवस्थित परतवुन घ्यावे.
  5. नंतर त्यात ब्लांच केलेले वाटाणे,कोथिम्बीर,चवीनुसार मीठ व थोडं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
  6. नंतर त्यात उकडलेले बटाटे (हवे त्या आकारत कापुन),गरम मसाला,आमचूर पावडर व थोडं पाणी टाकून भाजी ३-४ मिनिट शिजवुन घ्यावी.
  7. तयार भाजी सर्विंग प्लेट/बाऊल मधे काढून वरुन कोथिम्बीर आणि आल्याचे काप टाकून भाजी गार्निश करावी.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE