बटर पनीर | Butter Paneer Recipe in Marathi

प्रेषक Sayan Majumder  |  8th Aug 2016  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Butter Paneer by Sayan Majumder at BetterButter
बटर पनीर by Sayan Majumder
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

326

0

बटर पनीर recipe

बटर पनीर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Butter Paneer Recipe in Marathi )

 • पनीर (कॉटेज चीज) 500 ग्रॅम्स
 • लोणी 5 मोठे चमचे
 • तेल 1 लहान चमचा
 • तमालपत्र 2
 • लवंगा 2
 • दालचिनी 2 (1 इंच)
 • सुकलेल्या लाल मिरच्या - तुकडे केलेले 2
 • वाटलेले धणे 2 मोठे चमचे
 • 1 मध्यम कांद्याचे काप
 • आले पेस्ट 2 लहान चमचे
 • लसूण पेस्ट 2 लहान चमचे
 • धणेपूड 1 लहान चमचा
 • मध्यम टोमॅटो 5-6 चिरलेले
 • लाल तिखट 1 लहान चमचा
 • मीठ स्वादानुसार
 • कसुरी मेथी कुस्करलेली 1/2 लहान चमचा
 • ताजी साय 2 मोठे चमचे

बटर पनीर | How to make Butter Paneer Recipe in Marathi

 1. एका कढईत एक लहान चमचा तेलासह तीन मोठे चमचे लोणी गरम करा. त्यात तमालपत्र, लवंग, दालचिनी, लाल मिरच्या आणि वाटलेले अर्धे धणे घालून अर्ध्या मिनिटासाठी परता.
 2. कांदा घालून 30 सेकंदासाठी हळूहळू परता आणि त्यात आले पेस्ट, लसूण पेस्ट घाला. आणखीन तीस सेकंद्स परता. धणेपूड, लाल तिखट आणि टोमॅटो घाला. मोठ्या आचेवर मसाला तेल सोडेपर्यंत परता. मिश्रण जाड बनवा.
 3. एका नॉन-स्टीक भांड्यात उरलेले लोणी गरम करा, प्युरी झालेले मिश्रण 2 मिनिटांसाठी परता. त्यात पनीरचे तुकडे आणि मीठ घाला. अर्धा कप पाणी घाला. झाकून कमी आचेवर पाच मिनिटे शिजवा.
 4. कसुरी मेथी शिंपडून हलक्या हातांनी मिसळा. आचेवरून उतरवा आणि साय मिसळा. गरमागरम वाढा.

Reviews for Butter Paneer Recipe in Marathi (0)