Home / Recipes / Shev bhaji

Photo of Shev bhaji by Ajinkya Shende at BetterButter
2235
7
0.0(0)
0

Shev bhaji

Feb-09-2018
Ajinkya Shende
5 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Main Dish

Ingredients Serving: 3

  1. अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं
  2. अर्धा चमचा तीळ
  3. २ मोठे कांदे
  4. १ छोटा टोमॅटो
  5. खडा मसाला(२ लवंग,२ काळी मीरी,छोटा तुकडा दालचीनी)
  6. कढीपत्ता
  7. ७-८ लसुण पाकळ्या छोटा तुकडा आलं
  8. १ चमचा खांदेशी काळा मसाला
  9. पाव चमचा हळद
  10. पाऊण चमचा लाल मिर्ची पावडर
  11. अर्धा चमचा धणा-जीरा पावडर
  12. मीठ
  13. तेल
  14. तिखट जाड शेव
  15. वरून तडक्यासाठी २ पाकळ्या लसुण,बारीक कापलेली हिरवी मिर्ची,जीरं,सुकी लाल मिर्ची

Instructions

  1. प्रथम सुकं खोबरं लालसर होईपर्यंत परतवुन घ्यावं.
  2. नंतर तीळ थोडी भाजून घ्यावी.
  3. हयानंतर पॅन मधे ३-४ चमचे तेल टाकून तेल गरम झाल्यावर खडा मसाला टाकून अर्धा मिनिट परतवुन घ्यावा.
  4. नंतर तेलात बारीक चिरलेला कांदा लालसार होईपर्यंत परतवुन घ्यावा.
  5. कांदा परतवुन झाल्यावर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकून टोमॅटो नरम शिजेपर्यंत परतवुन घ्यावे.
  6. थंड खाल्यावर तीळ,खोबरं,आलं,लसुण व कांदा टोमॅटो मसाल्याची मिक्सरमधे स्मूथ पेस्ट बनवून घ्यावी.
  7. पुन्हा पॅन मधे ३-४ चमचे तेल टाकून तेल तापल्यावर त्यात ४-५ कढीपत्याची पानं बारीक कापून टाकवी व खोबरं कांद्याचं वाटण ४-५ मिनट मध्यम आचेवर परतवुन घ्यावे.
  8. नंतर हयात खांदेशी काळा मसाला,लाल मिर्ची पावडर,धणा-जीरा पावडर आणि हळद टाकून तेल सुटेपर्यंत परतवुन घ्यावे.
  9. नंतर हयात आकश्यकतेनुसार पाणी,चवीनुसार मीठ व बारीक कापलेली कोथिम्बीर टाकून रस्सा ५-७ मिनिट व्यवस्थित ऊकळवुन घ्यावा.
  10. रस्सा ऊकळल्यावर सर्विंग प्लेट मधे आवडीप्रमाणे तिखट जाड शेव टाकून त्यावर रस्सा टाकावा.
  11. वरून तडका देण्यासाठी फोडणीच्या भांडयात ३-४ चमचे तेल टाकून तेल व्यवस्थित तापल्यावर त्यात बारीक कापलेला लसुण,बारीक कापलेली हिरवी मिर्ची,अर्धा चमचा जीरं व १ सुकी लाल मिर्ची टाकून हा तडका शेवभाजीवरुन टाकावा.
  12. गार्निशिंग साठी वरून थोडी बारीक कापलेली कोथिम्बीर टाकवी.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE