Home / Recipes / Dal

Photo of Dal by Aarti Nijapkar at BetterButter
1006
5
0.0(0)
0

Dal

Feb-22-2018
Aarti Nijapkar
5 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Dal RECIPE

महाराष्ट्रीयन डाळ, वरण, गोडी डाळ असे बरेचसे प्रकार आहेत व चव सुद्धा डाळ भात किंवा वरण भात ह्या पदार्थाला कोणाचीही तोड नाही ,तर आपण अशीच एक डाळ बनवणार आहोत चला तर स्वादिष्ट डाळीकडे

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Roasting
  • Pressure Cook
  • Boiling
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. तुरीची डाळ १/२ वाटी
  2. मुगाची डाळ १/४ वाटी
  3. टोमॅटो १ मध्यम
  4. हळद १ लहान चमचा
  5. मीठ चवीनुसार
  6. शेवग्याच्या शेंगा तुकडे ६ ते ८
  7. वाटणासाठी
  8. ओला खोबरं १/४ वाटी
  9. हिरवी मिरची २ ते ३
  10. जिरे १ लहान चमचा
  11. लसूण २ ते ३ पाकळ्या
  12. कोथिंबीर १ मोठा चमचा
  13. फोडणीसाठी
  14. तेल १ मोठा चमचा
  15. मोहरी १ लहान चमचा
  16. कडीपत्ता ५ ते ६
  17. हिंग १/२ लहान चमचा

Instructions

  1. तुरीची डाळ व मुगाची डाळ एकत्र करून धुवुन घ्या मग ४ ते ५ मिनिटे पाण्यात भिजत ठेवा
  2. मग कुकर मध्ये डाळ घाला पुरेसे पाणी घाला टोमॅटो चिरून घाला न मीठ घालून ढवळा आणि शिजवून घ्या ३ ते ४ शिट्या होऊ द्या
  3. शेवग्याच्या शेंगा सोलून घ्या व पाण्यात थोडे मीठ घालून उकळवून घ्या
  4. आता कोथिंबीर , जिरे ,हिरवी मिरची, लसूण व ओल खोबरं मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या लागल्यास थोडं पाणी घालून वाटा
  5. टोपात तेल तापवून त्यात कडीपत्ता, मोहरी घाला व चांगली तडतडू द्या मग हिंग घाला व वाटलेला मसाला घालून चांगला परतवून घ्या मसाल्याचा कच्चा पणा जाईपर्यंत मसाला भाजून घ्या
  6. शिजवलेली डाळ रवीने गोठून घ्या आणि मसाल्यात डाळ ओता व शेवग्याच्या शेंगा घालून एकजीव करून घ्या हवं असल्यास थोडे मीठ घालावे व चांगली उकळी येऊ द्या ५ ते ७ मिनिटे
  7. तयार डाळीवर चिरलेली कोथिंबीर घाला
  8. भातासोबत गरमागरम आस्वाद घ्या

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE