झुडल्स | Zuddles Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  15th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Zuddles recipe in Marathi,झुडल्स, Archana Chaudhari
झुडल्सby Archana Chaudhari
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

About Zuddles Recipe in Marathi

झुडल्स recipe

झुडल्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Zuddles Recipe in Marathi )

  • हिरवी झुकीनी 1
  • गाजर 1 लहान
  • टोमॅटो 2
  • हिरवी मिरची 1
  • बेसिल पाने 4
  • लसूण पाकळ्या 5
  • कांदा लहान 1
  • टोमॅटो केचप 1 चमचा
  • काळी मिरी पावडर 1/2 चमचा
  • पिझ्झा सिझनीग 1 चमचा
  • ऑलिव्ह ऑइल 1 मोठा चमचा
  • चीज स्लाइस 1
  • मीठ चवीनुसार

झुडल्स | How to make Zuddles Recipe in Marathi

  1. झुकीनी आणि गाजर चे लांब लांब नूडल्स सारखे किसून घ्या,बाजारात यासाठी स्पायलराझर मिळते पण मी ग्रेटर ने केले आहे.
  2. सगळे साहित्य एकत्र करून ठेवा.
  3. एका कढईत गरम पाणी करायला ठेवा,पाणी उकळल्यावर त्यात झुकीनी आणि गाजरच्या नूडल्स टाका,1 मिनिट ठेऊन लगेच गाळून घ्या.पाणी फेकू नका, किचन मध्ये वापरता येईल.
  4. दुसऱ्या कढईत तेल टाकून त्यात बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा,बारीक चिरलेली बेसिल ची पाने घाला.
  5. टोमॅटोची पेस्ट घाला.
  6. चांगले परतू दया.
  7. सगळे मसाले घाला.
  8. उकडलेल्या झुडल्स घाला,मीठ घाला.
  9. वरून किसलेले चीज घाला.
  10. झटपट झुडल्स तयार आहे.

My Tip:

तुम्ही यात तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता.

Reviews for Zuddles Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo