1756
2
0.0(0)
0

काळ मटण

Jun-16-2018
Priti Tara
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काळ मटण कृती बद्दल

रेसिपी आहे काळ्या मटणाची.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. साहित्य – १ किलो कोवळ्या मटनाचे तुकडे (स्वच्छ धुवून घ्या), २ मोठे कांदे मध्यम आकारात चिरलेले, १०-१२ लसूण पाकळ्या- दीड इंच आलं यांचं वाटण, २-३ टीस्पून तिखट, चिमूटभर हळद, मीठ चवीनुसार, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  2. वाटण मसाला – अर्धी सुक्या खोब-याची वाटी आणि ३ मोठे कांदे गॅसवर डायरेक्ट काळे होईपर्यंत भाजा आणि त्याचं छान एकजीव वाटण करून घ्या.
  3. पूड करण्याचा मसाला – २ टीस्पून धणे, अर्धा टीस्पून शहाजिरं, १ इंचाचे २ दालचिनीचे तुकडे, २ तमालपत्रं, जायफळाचा लहानसा तुकडा (१/६ तुकडा), अर्धा टीस्पून बडीशेप, १ टीस्पून खसखस, ६-७ लवंगा, १०-१२ मिरी दाणे, १ बडी वेलची, २ साध्या वेलच्या (हे सगळे साहित्य अगदी थोड्याशा तेलावर खमंग तपकिरी रंगावर भाजा. थंड झाल्यावर कोरडी पूड करा.)
  4. फोडणीचं साहित्य – २ टेबलस्पून तेल, २ वेलच्या, लहानसा दालचिनीचा तुकडा, १ तमालपत्र

सूचना

  1. १) कुकरला तेल गरम करा. तेल चांगलं तापलं की त्यात खडा मसाला घाला. २) तो तडतडला की त्यात कांदा घाला. कांदा चांगला खमंग लाल परतल्यावर त्यात आलं-लसणाचं वाटण घाला. तेही चांगला खरपूस वास येईपर्यंत परता. ३) त्यानंतर त्यात हळद, तिखट आणि मीठ घाला. चांगलं परतून त्यावर मटन घाला. ४) नीट हलवून घ्या आणि १ वाटी पाणी घाला. कुकरचं झाकण लावून ५-६ शिट्या करा. ५) कुकरचं प्रेशर सुटल्यावर त्यात कोरडी पूड घाला. चांगला घमघमाट येईपर्यंत उकळा. ६) नंतर त्यात कांदा-खोब-याचं वाटण घाला. ७) मंद आचेवर दहा मिनिटं छान शिजवा. ८) वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. काळं मटन तयार आहे. या मटनाबरोबर ताजा पाव, तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, पोळ्या किंवा गरम भात असं काहीही छान लागतं असं आमच्या घरातल्यांचं म्हणणं आहे. मी खात नसल्यामुळे मला त्याची कल्पना नाही.  बरोबर अर्थातच कच्चा कांदा, काकडी, टोमॅटो, लिंबू घ्या.
  2. *Recipe credit सायली राजाध्यक्ष

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर