मुख्यपृष्ठ / पाककृती / बाजरीचे लसुणी कचोरी

Photo of Bajriche Lasuni Kachori by Aarti Nijapkar at BetterButter
554
2
0.0(0)
0

बाजरीचे लसुणी कचोरी

Jul-01-2018
Aarti Nijapkar
35 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बाजरीचे लसुणी कचोरी कृती बद्दल

बाजरीचे कचोरी आज आपण बनवणार आहोत तर बाजरीचे म्हणजे कचोरीचे आवरण हे बाजरीच्या पिठाचे असणार आहे आणि आत हिरव्या मटारचे सारण ...चला तर पाहूयात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. कचोरीच्या आवरणासाठज
  2. बाजरीचे पीठ १ वाटी
  3. तांदळाचे पीठ किंवा मैदा १ मोठा चमचा
  4. मीठ १/४ लहान चमचा
  5. गरम तेल १ लहान चमचा
  6. ओवा १/४ लहान चमचा
  7. पाणी गरजेनुसार
  8. कचोरीच्या सारणासाठी
  9. हिरवे मटार वाफवलेले १ वाटी
  10. बेसन १/४ वाटी
  11. कोथिंबीर २ मोठे चमचे
  12. हिरवी मिरची बारीक कापलेले २
  13. लसूण पाकळ्या ५ ते ६ (आवडीनुसार)
  14. बडीशेप भाजलेली १ छोटा चमचा
  15. गरम मसाला १ लहान चमचा
  16. लाल तिखट १ लहान चमचा
  17. हळद १/४ लहान चमचा
  18. मीठ चवीनुसार
  19. तेल कचोरी तळण्यासाठी

सूचना

  1. कचोरीचे आवरण बाजरीचे पीठ , तांदळाचे पीठ , मीठ , ओवा , गरम तेल सर्व एकत्र करून घ्या मग आवश्यकतेनुसार पाणी घालून मळून घ्या फार सैल कणिक मळू नये ५ ते ७ मिनिटे बाजूला ठेवून द्या
  2. कचोरीचे मिश्रण
  3. वाफवलेले मटार कुस्करून घ्या
  4. गॅस वर कढाई ठेवा त्यात तेल तापवून घ्या आता त्यात जिरे , हिरवी मिरची घाला व परतवून घ्या
  5. आता ठेचून लसूण घाला मंद आचेवर परतवून घ्या
  6. मग बेसन घाला चांगलं खमंग येईपर्यंत परतवून घ्या
  7. आता कुस्करलेले मटार घाला व एकत्र करून घ्या
  8. त्यात चिरलेली कोथिंबीर , बडीशेप , गरम मसाला , लाल तिखट घालून मिश्रण एकत्र करून घ्या
  9. चवीनुसार मीठ , हळद घालून सारण ४ ते ५ मिनिटे वाफवून घ्या
  10. गॅस बंद करून घ्या
  11. तयार सारण ताटात काढून घ्या म्हणजे गार होईल
  12. मळलेले पीठ घ्या थोडं तेलाचं हात घेऊन हलक्या हाताने मळून घ्या
  13. पिठाचे / कणकेचे छोटे गोळे घेऊन हाताच्या बोटांनी पसरवून घ्या मग त्यात सारण भरून घ्या आणि वरची बाजू बंद करा
  14. आणि दोन्ही ताल हाताच्या मधोमध ठेवून हलकं दाबून घ्या म्हणजे कचोरीचा आकार छान येईल
  15. अश्या प्रकारे सर्व कचोरी तयार करून घ्या
  16. कढईत तेल तापवून घ्या तेल चांगलं कडकडीत तापवून घ्या
  17. आता मध्यम आच करून कचोरी तेलात तळून घ्या
  18. दोन्ही बाजूने सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या
  19. गरमागरम बाजरीचे कचोरी तयार आहेत
  20. आवडीनुसार सर्व्ह करावे दही, बुंदी , चटणी , सॉस , शेव सोबत किंवा अशीच गरमागरम सुद्धा छान लागतात
  21. टिप कचोरीच्या आवरणासाठी चे कणकेचे गोळे मध्यम आकाराचे घ्यावे म्हणजे तेलात तळल्यावर कुरकुरीत होतील आणि आवरण आणि सारण दोघांची मजा घेता येईल
  22. आवरण जाड असेल तर कचोरी कुशकुशीत होत नाहीत आणि खाताना पीठ जास्त लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर