तिळाचे तळलेले गोळे (थाई) | Thai Sesame fried ball Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  4th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Thai Sesame fried ball recipe in Marathi,तिळाचे तळलेले गोळे (थाई), Archana Chaudhari
तिळाचे तळलेले गोळे (थाई)by Archana Chaudhari
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    45

    मि.
  • किती जणांसाठी

    6

    माणसांसाठी

2

0

तिळाचे तळलेले गोळे (थाई) recipe

तिळाचे तळलेले गोळे (थाई) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Thai Sesame fried ball Recipe in Marathi )

  • कॉव्हरसाठी
  • तांदळाचे पीठ 1 वाटी
  • मैदा 1 वाटी
  • बटाटा उकडून पेस्ट 3 मोठे चमचे
  • साखर 3 मोठे चमचे
  • गरम पाणी 4 मोठे चमचे
  • मीठ 1/2 चमचा
  • तीळ 1/2 वाटी
  • तेल तळायला
  • सारणासाठी
  • पिवळी मूग डाळ 1/2 वाटी
  • साखर 3 मोठे चमचे
  • तेल 1 चमचा
  • मीठ 1 चिमूटभर
  • व्हॅनिला एस्सेन्स 1/2 चमचा

तिळाचे तळलेले गोळे (थाई) | How to make Thai Sesame fried ball Recipe in Marathi

  1. पिवळी मुगाची डाळ 15मिनिटे पाण्यात भिजवा.
  2. 15 मिनिटांनंतर पाण्यामध्ये शिजवून घ्या.खूप पाणी नका घालू.
  3. आता डाळी मध्ये साखर ,तेल,मीठ,व्हॅनिला एस्सेन्स टाका.
  4. मिश्रण चांगले एकजीव होऊ द्या.
  5. वरील कव्हर साठी तांदूळ पीठ,मैदा,बटाट्याची पेस्ट,गरम पाणी, मीठ टाकून मळून घ्या.
  6. उंडा छान मळून घ्या.
  7. 30 मिनिटे झाकून ठेवावे.
  8. आता छोटासा गोळा घेऊन,सारण आतमध्ये भरून गोळा व्यवस्थित बंद करा.
  9. आता प्रत्येक गोळा तीळामध्ये घोळवून घ्या.सगळे गोळे असेच करून घ्या.
  10. आता कढईत तेल तापवून मध्यम आचेवर सगळे गोळे तळून घ्या
  11. गरम गरम खा. :blush:

My Tip:

सारणात खोबरे टाकू शकता.

Reviews for Thai Sesame fried ball Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo