हनी ड्रायफ्रुट केक | Honey Dryfruits Cake Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  4th Jul 2018  |  
5 from 1 review Rate It!
  • Honey Dryfruits  Cake recipe in Marathi,हनी ड्रायफ्रुट केक, samina shaikh
हनी ड्रायफ्रुट केकby samina shaikh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    35

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

1

1

हनी ड्रायफ्रुट केक recipe

हनी ड्रायफ्रुट केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Honey Dryfruits Cake Recipe in Marathi )

  • 1 वाटी मैदा
  • 1 वाटी बारीक साखर पुड
  • 1चमचा व्यानीला इसेंस
  • 2चमचे बेकीग पावडर
  • अर्धी वाटी अमूल बटर
  • ड्रायफ्रुट
  • बटर पेपर
  • 5चमचे मध (मधात 1चमचा साखर घालून उकळून घ्या व थंड करा)
  • 3अंडी

हनी ड्रायफ्रुट केक | How to make Honey Dryfruits Cake Recipe in Marathi

  1. प्रथम बटर व साखर छान मिक्सरमध्ये फेटुन घ्या
  2. आता 1अंड व अर्धा चमचा मैदा घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्या
  3. परत 1अंडे व मैदा असे 3वेळा करा.
  4. बेकीग पावडर घाला
  5. आता व्यानीला इसेन्स घाला
  6. ब्याटर परत फिरवून घ्या
  7. एका पातेल्यात वरील ब्याटर घाला
  8. अर्धा अर्धा या प्रमाणे मैदा ब्याटर मधे चालूंण एकाच दिशेने ब्याटर हलक्या हाताने चमच्या च्या साह्याने स्टर(मीक्स)करा
  9. ब्याटर मधे गुठळ्या रहाता कामा नये
  10. 1का पातेल्याला आतून बटर व पीठाची ग्रीसीग करुन घ्या व बटर पेपर लावा
  11. आता त्या पातेल्यात ब्याटर घाला व पातेले ट्याब करा जेणे करुन एयर बबल्स निघून जातील
  12. वरुन ड्रायफ्रुट घाला
  13. आता गँस वर मोठे जाड पातेले ठेवा
  14. त्यात 1 छोटे झाकन ठेवा व त्यावर ब्याटर चे पातेले ठेवा
  15. आता वरुन झाकन ठेवून 5मीन मीडियम फ्लेम वर व नंतर 25min स्लो फ्लेम वर केक शिजु द्या(वाफ बाहेर जाता कामा नये)
  16. एक सूरी घालून केक चेक करा सूरी क्लीण बाहेर आली की केक तयार समजा
  17. केक शिजल्यावर थंड करा व मधोमध कापा
  18. साखर मधाचे पाणी केक वर चम्च्याणे घाला
  19. आता चहा सोबत केक सर्व करा

My Tip:

केक ब्याटर जितक्या हलक्या हाताने मीक्स कराल तितके केक सॉफ्ट होईल

Reviews for Honey Dryfruits Cake Recipe in Marathi (1)

Nayana Palav3 months ago

Wow
Reply