इंस्टंट गहूला खीर | Instant Gahula Kheer Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Instant Gahula Kheer recipe in Marathi,इंस्टंट गहूला खीर, Maya Ghuse
इंस्टंट गहूला खीरby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    60

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

इंस्टंट गहूला खीर recipe

इंस्टंट गहूला खीर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Instant Gahula Kheer Recipe in Marathi )

  • मैदा अर्धी वाटी
  • दूध 3कप
  • विलायती पावडर अर्धा चमचा
  • साखर अर्धी वाटी
  • कणीक 1 वाटी
  • तूप 3-4 चमचे
  • ड्रायफ्रूट आवडीनुसार
  • मीठ चवीनुसार

इंस्टंट गहूला खीर | How to make Instant Gahula Kheer Recipe in Marathi

  1. मैदा, मीठ पाण्याने भिजवून ठेवले 20मी.नंतर गहूले बनविले
  2. गहूले
  3. तवा गरम करून गैस बंद केला व तव्यावर परतले वाटीत काढून पून्हा तवा गरम करून गैस बंद केला व पून्हा गहूले तव्यावर टाकून परतले असे 3-4 वेळा केले, 3-4 गहूले फोडून पाहीले, वाळले की नाहीते
  4. आता पातेल्यात पाणी उकळवून त्यात गहूले टाकून उकळवून घेतले, हे सतत हालवत रहावे नाहीतर बुडाला लागतात
  5. दूसर्या पातेल्यात दूध तापवून त्यात साखर, ड्रायफ्रूट, खोबरा किस, विलायची पावडर मिसळवली
  6. हे दूध गहूल्याच्या मिश्रणात घातले व उकळवून घेतले आणि सर्व्हीग बाउलमध्ये ओतले
  7. आता पानोळे करू - त्याकरिता कणीक, मीठ पाण्याने भिजवून ठेवले
  8. एक पूरी लाटून त्यावर तेल लावून दूमडून पुन्हा तेल लावून पुन्हा दूमडून त्रिकोणी घड़ी करून घेतली
  9. पानोळे
  10. स्टीमरमध्ये ठेवून स्टीमकरून वाफवून घेतले ,वरून तूप घालून सर्व्ह केले गहूल्याच्या खीरी बरोबर

My Tip:

गहूल्याच्या खीरी बरोबर पानोळे खाल्ले जातात

Reviews for Instant Gahula Kheer Recipe in Marathi (0)