व्हेज अप्पे | Veg Appe Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  18th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Veg Appe recipe in Marathi,व्हेज अप्पे, Sujata Hande-Parab
व्हेज अप्पेby Sujata Hande-Parab
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

व्हेज अप्पे recipe

व्हेज अप्पे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Veg Appe Recipe in Marathi )

  • इडली पिठ - १ कप
  • कांदा १/२ - बारीक चिरून,
  • हिरवी मिरची - १ बारीक चिरून किंवा उभी कापून घेतलेली.
  • किसलेले आलं - १/२ टिस्पून
  • कोथिंबीर पाने - १ चमचा बारीक चिरलेली
  • किसलेले किंवा बारीक तुकडे केलेले गाजर - १/४ कप
  • मटार अर्धे शिजवून घेतलेले -१/४ कप किंवा फ्रोझन
  • चवीनुसार मीठ
  • तेल - 2-3 टिस्पून साच्याला लावण्यासाठी
  • सर्विंग साठी - टोमॅटो चटणी

व्हेज अप्पे | How to make Veg Appe Recipe in Marathi

  1. एक मोठ्या वाडग्यात इडली पिठ घेऊन कांदा, हिरव्या मिरची, किसलेले आले, बारीक चिरलेली कोथींबीर, किसलेले गाजर, मटारचे तुकडे, मीठ घालावे. जास्त ढवळू नये.
  2. एक अप्पे पॅन मध्ये सिलिकॉन ब्रश किंवा चमच्याने तेल पसरवा.
  3. एक टेबलस्पून मिश्रण प्रत्येक अप्पे साचात घाला. झाकण ठेवून १ मिनिट शिजवा. झाकण काढा आणि लाकडी काटा किंवा टूथपीक वापरून वरची बाजू खाली करा किंवा परतून घ्या.
  4. दुसऱ्या बाजूला हि त्यांना शिजू द्यावे. उर्वरित पिठाचे अप्पे असा प्रकारे बनवून घ्या.
  5. टोमॅटो चटणीबरोबर सर्व्ह करावे.

My Tip:

समान शिजण्यासाठी पॅन प्लेट ने झाकून घ्या. मिश्रण जास्त ढवळू नका.

Reviews for Veg Appe Recipe in Marathi (0)