ओट्स कोथिंबीर वडी | Baked oats kothimbir vadi Recipe in Marathi

प्रेषक seema Nadkarni  |  19th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Baked oats kothimbir vadi recipe in Marathi,ओट्स कोथिंबीर वडी, seema Nadkarni
ओट्स कोथिंबीर वडीby seema Nadkarni
  • तयारी साठी वेळ

    60

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    35

    मि.
  • किती जणांसाठी

    8

    माणसांसाठी

4

0

ओट्स कोथिंबीर वडी recipe

ओट्स कोथिंबीर वडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Baked oats kothimbir vadi Recipe in Marathi )

  • 1/2 किलो कोथिंबीर
  • 2 कप ओट्स
  • 1 कप बेसन
  • 8-10 लसूण पाकळ्या
  • 1 तूकडा आले
  • 1/4 कप तेल
  • 1 चमचा तीळ
  • 4-5 हिरव्या मिरच्या
  • 1/4 कप दही
  • 1/2 चमचा लाल तिखट
  • 1/4 चमचा हळद
  • 1-2 चमचा साखर
  • चवी पुरते मीठ
  • 1/2 चमचा कूकिंग सोडा

ओट्स कोथिंबीर वडी | How to make Baked oats kothimbir vadi Recipe in Marathi

  1. सौ प्रथम एका भांड्यात कोथिंबीर स्वच्छ धुवून, बारीक चिरून घ्यावी.
  2. 2 कप ओट्स ला मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे.
  3. कोथिंबीर च्या मिश्रणात तेल, आले लसुण मिरची पेस्ट, दही, हळद, लाल तिखट, घालून एकत्र करावे.
  4. या मिश्रणात ओट्स आणि बेसनाचे पीठ घालून एकत्र करावे.
  5. ओवन ला प्री हिट करून घ्या.
  6. बेकिंग ट्रे मध्ये तेलाचा हात लावून घ्या, त्यात वरील कोथिंबीर चे मिश्रण घालून घ्या.
  7. बेकिंग ट्रे ला ओवन मध्ये ठेवून 30 - 40 मिनिटे बेक करुन घ्या.
  8. बेक झाले कि त्या वर तेल किंवा बटर लावून घ्या.
  9. थंड झाल्यावर त्याचे चऊरस तुकडे करून घ्यावेत.

My Tip:

ओट्स ला मिक्सर मधून बारीक पावडर करून घ्या.

Reviews for Baked oats kothimbir vadi Recipe in Marathi (0)