दडपे पोहे | Dadpe pohe Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  22nd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Dadpe pohe recipe in Marathi,दडपे पोहे, Archana Chaudhari
दडपे पोहेby Archana Chaudhari
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

दडपे पोहे recipe

दडपे पोहे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dadpe pohe Recipe in Marathi )

  • पातळ पोहे १ १/२ कप
  • नारळाचे पाणी १/२ कप
  • नारळाचा चव १ कप
  • कांदा १ मध्यम बारीक चिरलेला
  • लिंबू १/२
  • हिरवी मिरची १ बारीक चिरलेली
  • साखर १ टेबलस्पून
  • मीठ चवीनुसार
  • तेल १टेबलस्पून
  • मोहरी १/२ टीस्पून
  • शेंगदाणे १टेबलस्पून
  • हिंग १/२ टीस्पून
  • कढीपत्ता ५ पाने

दडपे पोहे | How to make Dadpe pohe Recipe in Marathi

  1. पातळ पोहे चाळून,१ मिनिट कढईत शेकून घ्या.
  2. एका भांड्यात पातळ पोहे,नारळाचे पाणी,नारळाचा चव,साखर एकत्र करून झाकून ठेवा.
  3. कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे तळुन वरील पोह्यांवर घाला.
  4. आता त्याच तेलात,मोहरी, हिंग,कढीपत्ता टाकून फोडणी करा.
  5. फोडणी पोह्यांवर घाला.
  6. आता पोह्यांवर हिरवी मिरची, कापलेला कांदा, लिंबू, मीठ टाकून छान एकत्र करून घ्या.
  7. झाकण ठेवून १० ते १५ मिनिटे दडपून (झाकून ) ठेवा.
  8. दडपे पोहे तयार आहेत.

My Tip:

तुम्ही यात काकडी,कोथिंबीर घालू शकता.

Reviews for Dadpe pohe Recipe in Marathi (0)