पाव भाजी | Pav bhaji Recipe in Marathi

प्रेषक seema Nadkarni  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Pav bhaji recipe in Marathi,पाव भाजी, seema Nadkarni
पाव भाजीby seema Nadkarni
  • तयारी साठी वेळ

    60

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    50

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

3

0

पाव भाजी recipe

पाव भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pav bhaji Recipe in Marathi )

  • 250 ग्राम बटाटे
  • 100 ग्राम कोबी
  • 50 ग्राम फ्लावर
  • 50 ग्राम भोपळी मिरची
  • 100 ग्राम मटार
  • 4-5 कांदे
  • 500 ग्राम टोमॅटो
  • 2 चमचा लाल तिखट
  • 1 चमचा पाव भाजी मसाला
  • 1/2 चमचा हळद
  • 2-3 चमचा लिंबाचा रस
  • कोथिंबीर
  • चवी पुरते मीठ

पाव भाजी | How to make Pav bhaji Recipe in Marathi

  1. प्रथम सवॅ भाज्या बटाटे, कोबी, फ्लॉवर वांगी मध्यम आकाराचे तुकडे करून कूकर मध्ये शिजवून घ्या, त्यात मटार पण शिजवून घ्या
  2. कूकर थंड झाल्यावर भाज्या एकत्र करून घ्यावे.
  3. कांदे, टोमॅटो, भोपळी मिरची बारीक चिरून घ्यावी.
  4. कढई मध्ये 4-5 चमचा तेल घालून, त्यात बारीक चिरलेला कांदा, टॉमेटो चांगले परतून घ्या.
  5. बारीक चिरलेली भोपळी मिरची घालून परतून घ्यावे.
  6. तेल सुटायला आले की त्यात वरील शिजवून घेतलेल्या भाज्या घालून या मिश्रणा ला व्यवस्थित एकत्र करावे.
  7. त्यात लाल तिखट, चवीपुरते मीठ, हळद, पाव भाजी मसाला घालून एकत्र करावे.
  8. थोड्या वेळ झाकून ठेवावे, दूसरया छोट्या कढई मध्ये थोडे बटर टाकून त्यात थोडे लाल तिखट घालून वरून फोडणी करावी.
  9. छान रंग येईल भाजी ला, गॅस बंद करून वरून लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून सवँ करावे.
  10. बारीक चिरलेला कांदा, टॉमेटो, कोबी, चिरून सॅलड तैयार करावे.
  11. 2-3 चमचा बटर घालून भाजी - बटर मध्ये भाजलेले पाव- सॅलड सोबत सर्व करावे.

Reviews for Pav bhaji Recipe in Marathi (0)