मुख्यपृष्ठ / पाककृती / ओट्स रवा डोसा

Photo of Oats Rava Dosa by Sujata Hande-Parab at BetterButter
665
5
0.0(0)
0

ओट्स रवा डोसा

Jul-25-2018
Sujata Hande-Parab
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओट्स रवा डोसा कृती बद्दल

ओट्स रवा डोसा हि एक अतिशय जलद होणारी हेलथी पाककृती आहे. थोडासा कुरकुरीत आणि जाळीदार असा हा डोसा चटणी बरोबर अतिशय उत्तम लागतो. हा डोसा करताना पाणी टाकताना आणि मिश्रणाची कॉन्सिस्टन्सी बरोबर असणे अतिशय आवश्यक आहे नाही तर डोसा जाड किंवा पातळ निघतो. जाळी पडत नाही. रवा ओट्स मिश्रण १०-१५ मिनिटे बाजूला ठेवावे आणि नंतरच डोसा करावा. मिश्रण टाकताना व्यवस्तिथ तव्यावर पडले पाहिजे आणि त्याला छान जाळी आली पाहिजे तर ते मिश्रण डोसे करण्यायोग्य समजावे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • फ्युजन
  • पॅन फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ओट्स पीठ - ३/४ कप (ओट्स मिक्सरला लावून त्याचे पीठ करून घेणे.)
  2. रवा - १/४ कप
  3. तांदळाचे पीठ - ४-५ टेबलस्पून
  4. दही - १/४ कप (फेटून घेतलेले)
  5. बारीक कापलेली हिरवी मिरची - २ (थोड्या कमी तिखट असणाऱ्या)
  6. कोथिंबिरीची पाने बारीक कापून घेतलेली - ४ टेबलस्पून 
  7. अद्रक - १ टीस्पून किसून घेतलेले
  8. कांदा - १/२ एकदम बारीक चिरून घेतलेला 
  9. जिरे-१ टीस्पून 
  10. काली मिरी पूड - १ टीस्पून 
  11. मीठ चवीनुसार 
  12. तेल - १ टेबलस्पून डोसा मिश्रणामध्ये घालण्यासाठी - ३-४ टेबलस्पून डोसा भाजण्यासाठी
  13. पाणी - १ १/२ - २ कप किंवा जसे लागेल तसे अतिघट्ट किंवा पातळ मिश्रण नको. 

सूचना

  1. एका मोठ्या टोपात किंवा वाडग्यात पाणी सोडून सगळे पदार्थ घ्यावेत. चांगले मिक्स करून घ्यावेत.
  2. पाणी हळू हळू टाकून मिश्रण व्यवस्तिथ जास्त घट्ट किंवा अति पातळ नसेल असे करावे. १०-१५ मिनिटे बाजूला झाकून ठेवावे. जेणेकरून रवा थोडासा फुगतो.
  3. एका नॉनस्टिक पॅनला तेल लावून घ्यावे. त्यावर बनवलेले मिश्रण थोडे घालून पाहावे. आच जास्त-माध्यम असावी. मिश्रण टाकताना व्यवस्तिथ तव्यावर पडले पाहिजे आणि त्याला छान जाळी आली पाहिजे तर ते मिश्रण डोसे करण्यायोग्य समजावे.
  4. जर मिश्रण पाहिजे तसे झाले असेल तर एका खोलगट चमच्याने ते व्यवस्तिथ गोलाकार तापलेल्या तव्यावर किंवा पॅन वर टाकावे. १०-१५ सेकंदासाठी झाकण ठेवावे.
  5. झाकण काढून थोडा वेळ भाजू द्यावे.
  6. जेव्ह डोशाच्या बाजू सुटू लागतील त्या वेळेस तो परतून घ्यावा. दुसऱ्या बाजूने हि व्यवस्तिथ ब्राउन आणि थोडा कुरकुरीत होईपर्यंत भाजावा.
  7. चटणी बटोबार सर्व्ह करावा किंवा टिफिन मध्ये भरून द्यावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर