ड्रॅगनफ्रूट पॅनकेक | Dragon fruit Pancake Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Dragon fruit Pancake recipe in Marathi,ड्रॅगनफ्रूट पॅनकेक, Sujata Hande-Parab
ड्रॅगनफ्रूट पॅनकेकby Sujata Hande-Parab
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

3

0

ड्रॅगनफ्रूट पॅनकेक recipe

ड्रॅगनफ्रूट पॅनकेक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dragon fruit Pancake Recipe in Marathi )

  • तेल - २-३ टेबलस्पून तळण्यासाठी
  • पीठी साखर - 3 - ४ टेबलस्पून आपल्या चवीनुसार कमी जास्त करा
  • ड्रॅगनफ्रूट पल्प किंवा घट्ट रस – 3/4 कप
  • दूध - १ - १ १/२ कप
  • कॉर्न फ्लोर सफेद - १/४ कप
  • मैदा - १ कप
  • बेकिंग पावडर - १/२ टीस्पून
  • बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा - १/२ टीस्पून
  • सजावटीसाठी आणि सर्व्ह करण्यासाठी - मध - २-३ टेबलस्पून
  • चेरीस - १ टेबलस्पून बारीक कापलेली 
  • डाळिंबाचे दाणे - १-२ टेबलस्पून
  • बारीक तुकडे केलेला ड्रॅगनफ्रूट – १/४ कप 
  • केळ्याचे पातळ काप

ड्रॅगनफ्रूट पॅनकेक | How to make Dragon fruit Pancake Recipe in Marathi

  1. एका वाडग्यात मैदा, कॉर्न फ्लोर, खाण्याचा सोडा आणि बेकिंग पूड चाळून घ्या.
  2. त्यात ड्रॅगनफ्रूट रस आणि दूध घालून हळू हळू ढवळून घ्या. मिश्रण जास्त पातळ करू नये
  3. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात एक वाटी चमचा ड्रॅगनफ्रूट पीठ मिश्रण गोलाकार घाला. आच पीठ टाकताना मध्यम जास्त असू द्या. नंतर लगेचच तो मंद मध्यम ठेवा. नाही तर पॅनकेक करपतील
  4. काही सेकंदांनी थोडे थोडे बुडबुडे पॅनकेक वर येतील आणि त्याच्या बाजू सुटू लागतील. तेव्हा तो परतून घ्या.
  5. दुसरी बाजू १ मिनिटे भाजून घ्या. काढून प्लेट वर ठेवा. असा प्रकारे सगळे पॅनकेक करून घ्या.
  6. सर्व्ह करताना वरून ड्रॅगनफ्रूट, केळ्याचे पातळ काप, डाळिंबाचे दाणे, मध आणि चेरीस घालून सर्व्ह करा किंवा टिफिन मध्ये घालून द्या

My Tip:

मधाऐवजी मॅपल सिरपचा वापर, विविध फळाबरोबर हे सर्व्ह करू शकता.मिश्रण जास्त घट्ट असल्यास समान तापमान असलेले दूध वापरू शकता

Reviews for Dragon fruit Pancake Recipe in Marathi (0)