मुख्यपृष्ठ / पाककृती / दोडक्यातले मूठे

Photo of Dodkyatle by Vaishali Joshi at BetterButter
89
4
0.0(0)
0

दोडक्यातले मूठे

Jul-25-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दोडक्यातले मूठे कृती बद्दल

हा एकच पदार्थ जरी टिफिन मधे नेला तरी पुरेसा आहे .आणि लज्जतदार तर इतका की टिफिन चाटून पुसून साफ .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कणिक ३ कप
  2. रेशाळ दोडके १/२ किलो
  3. कांदा १ छोटा
  4. टोमेटो १ मोठा
  5. हिरव्या मिरच्या ५-६
  6. कोथिंबीर भरपूर
  7. लसूण१/४ वाटी
  8. तिखट
  9. हळद
  10. मीठ
  11. आमचूर
  12. हिंग
  13. मोहोरी
  14. साखर
  15. धने पावडर
  16. जीरे पावडर
  17. गरम मसला
  18. तेल

सूचना

  1. दोडके सोलून फोड़ी करुन घ्या
  2. कांदा टोमेटो मिरच्या लसूण बारीक़ चिरुन घ्या
  3. कणिक गुलाबिसर भाजून घ्या , थंड झाली की त्यात चिरलेला अर्धा लसूण , तिखट , हळद , मिठ ,धणे पावडर ,जीरे पावडर ,आमचूर , चवीपूरती साखर ,गरम मसाला , कोथिंबीर आणि १/२ वाटी तेल घालून पाण्याने भिजवून १० मिनिट ठेवा .
  4. भिजवून ठेवलेल्या गोळ्य़ाचे छोटे छोटे मुठे वळून घ्या . मुठे खुप दाबुन वळू नये
  5. गैस वर कढईत १/२ वाटी तेल घालून तापल्या वर मोहोरी हिंग मिरच्या कांदा लसूण घालून लालसर झाल्यावर टोमेटो घाला
  6. तिखट हळद धणे जीरे पावडर गरम मसाला घालून चिरलेले दोडके घाला परतून घ्या
  7. थोड पाणी घाला मीठ घाला , पाणी उकळू लागल्यावर मुठे टाका ३-४ मिनिट न परतता तसेच राहू द्या आणि झाकण ठेवा
  8. ५ मिनिटाने परतून घ्या आणि १०-१५ मिनिटे झाकून ठेवा मंद आचेवर पाणी आटे पर्यन्त . शिजल्या ची खात्री झाली की गैस बंद करा
  9. बस तयार झाले दोडक्यातले मुठे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर