मिक्स डाळ वडे | Mix Dal Wade Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  26th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Mix Dal Wade recipe in Marathi,मिक्स डाळ वडे, Bharti Kharote
मिक्स डाळ वडेby Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    9

    तास
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

2

0

मिक्स डाळ वडे recipe

मिक्स डाळ वडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mix Dal Wade Recipe in Marathi )

  • एक वाटी चना डाळ
  • एक वाटी तूर डाळ
  • एक वाटी मूग डाळ
  • एक वाटी वाटाणे डाळ
  • 5/6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • आल लसूण कोथंबीर पेस्ट एक चमचा
  • पाव चमचा हळद जीरे पूड धने पुड हिंग
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल

मिक्स डाळ वडे | How to make Mix Dal Wade Recipe in Marathi

  1. 8 तास सर्व डाळी पाण्यात भिजत घाला..
  2. मिक्सर मधून सर्व डाळी पाणी न टाकता वाटून घ्या. .त्यात आल लसूण हिरवी मिरची कोथिंबीर पेस्ट घालून मिक्स करून घ्या.
  3. त्यात हळद जीरे पूड धने पुड हिंग मीठ घालून चांगल मिक्स करून घ्या. .
  4. 15 मी..बाजूला ठेवा. ..
  5. गॅस वर पॅन मध्ये तेल तापत ठेवा
  6. पाण्याचा हात घेऊन हातावर वडा थापून घ्या. .
  7. आणि अलगद तेलात सोडा
  8. दोन्ही बाजूंनी चांगले खमंग तळून घ्या.
  9. आणि गरम गरम वडे टोमॅटो साॅस किंवा कूठल्याही चटणी सोबत टीफीन ला दया. .

My Tip:

आवश्यकता वाटल्यास खायचा सोडा घालू शकता. .

Reviews for Mix Dal Wade Recipe in Marathi (0)