पत्ताकोबीचा झुणका | Pattakobicha zunaka Recipe in Marathi

प्रेषक Smita Koshti  |  27th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Pattakobicha zunaka recipe in Marathi,पत्ताकोबीचा झुणका, Smita Koshti
पत्ताकोबीचा झुणकाby Smita Koshti
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

पत्ताकोबीचा झुणका recipe

पत्ताकोबीचा झुणका बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pattakobicha zunaka Recipe in Marathi )

  • 2 वाट्या बारीक चिरलेली पत्ताकोबी
  • 1 चमचा आलं लसूण पेस्ट
  • 1 चमचा हिरवी मिरची पेस्ट
  • चिमूटभर गरम मसाला
  • चवीनुसार मीठ
  • बेसन पीठ 1 वाटी किंवा आवश्यकतेनुसार
  • कोथिंबीर बारीक चिरून थोडी
  • फोडणीसाठी मोहरी, जीरे, हिंग, तेल

पत्ताकोबीचा झुणका | How to make Pattakobicha zunaka Recipe in Marathi

  1. प्रथम कढईत तेल ( थोडे जास्त घेण साधारणपणे 4 चमचे ) गरम करून त्यात मोहरी जिरे तडतडल्यावर त्यात हिंग, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट टाकून चांगले परतून घ्या.
  2. लगेच त्यात चिरलेला पत्ताकोबी ,मसाला, मीठ घालून झाकण ठेवून एक वाफ आणावी.
  3. मग त्यात बेसन पीठ थोडे थोडे घालत जायचे व हलवत रहावे जेणेकरून एकजीव होईल.
  4. जास्त पीठ घालू नये बसेल तितकेच घालावे.नाहीतर झुणका कोरडा होतो. व झाकण ठेवून वाफ आणावी. अधून मधून हलवत रहावे.
  5. कोथिंबीर घालून सर्व्ह करा. किंवा थंड झाल्यावर डब्यात द्या.

My Tip:

आपण असे कुठल्याही पालेभाजी चा झुणका करु शकतो. सोबत गरम कढी पण द्यावी.

Reviews for Pattakobicha zunaka Recipe in Marathi (0)